womens day
womens day 
मुंबई

महिला दिना निमित्त व्ही. पी. रोड महिला पोलिसांचा सत्कार 

दिनेश चिलप मराठे

मुंबई : एक सामान्य महिला जेव्हा यशाच्या उंच शिखरावर पोहोचते तेव्हा ती खरी स्त्री शक्ती असते. तसे पाहिले तर पुरुष शक्तीपेक्षा स्त्रीशक्तीचा जागर अधिक असतो. पूर्वी पोलीस खात्यात महिलांचा टक्का फारच कमी होता. अत्यंत खडतर व कठीण समजल्या जाणाऱ्या पोलीस खात्यात पुरुषांच्या बरोबरीने काम करण्यासाठी महिला पुढे येत नव्हत्या; परंतु आज परिस्थिती बदलली आहे. पोलीस दलात महिलांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  प्रत्येक पदावर महिला काम करत आहेत. 8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत गिरगावमध्ये वेगवेगळ्या क्ष्रेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या महिलांचा गिरगाव अॅप च्या वतीने सन्मान करण्यात आला. व्ही. पी. रोड पोलीस स्थानकामध्ये महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी गिरगाव अॅप चे संपादक सुदीप नाईक यांनी महिला पोलिस उपनिरीक्षक संध्या निकम यांचा सत्कार केला.त्यांच्या या कर्तुत्वाला सलाम करण्यात आला.

व्ही. पी. रोड पोलीस स्थानकात महिला पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्या मोलाचे काम करत आहेत. त्याचबरोबर एक पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी म्हणून समाजात आपली प्रतिमा कशी उजळून निघेल यावर त्या भर देत आहेत. एखाद्या किचकट गुन्ह्याची दिशा कशी निश्चित करावी व आरोपींना गुन्ह्यात कशी कठोर शिक्षा होईल याच अभ्यास या महिला चतुरतेने करतात. या पोलीस स्थानकात महिला पोलीसानी गुन्हेगारांना पकडलं आहे आणि त्यांना शिक्षा देखील झाली आहे. आपल्या बुद्धी आणि कौशल्याच्या शिदोरीवर त्यांनी यशाचे अनेक शिखरे चढावे यासाठी त्यांना गिरगाव अॅप तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT