MarathaKrantiMorcha maharashtra band at poladpur and mangaon
MarathaKrantiMorcha maharashtra band at poladpur and mangaon 
मुंबई

पोलादपूर व माणगाव मध्ये कडकडीत बंद 

सुनील पाटकर

महाड - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला दक्षिण रायगडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलादपूर व माणगाव मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला व मोर्चाही काढण्यात आला. तर महाड व म्हसळा तसेच तळा शहरातील व्यवहार सुरळीत सुरु होते.

सोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात काकासाहेब शिंदे याचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. माणगाव व पोलादपूर मध्ये मराठा कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून निवेदने दिली.

व्यापाऱ्यांनी बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत पोलादपूर व माणगावमध्ये दुकाने बंद ठेवली आहेत. यामुळे येथील नागरिकांचे हाल झाले. महाडमध्ये बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.तळ्यामध्येही जनजीवन व सर्व सुरळीत होते तर म्हसळा बाजारपेठेतील दुकानेही उघडी होती. परंतु मालवाहतूकीच्या गाड्या बंदत अडकल्याने बाजारपेठेत मालाची आवक जावक ठप्प होती. बाजारपेठेत याचा परिणाम दिसुन आला. ठिकठिकाणी मराठा संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरुळीत होती. या परिसरात बंद शांततेत पार पडला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT