Dengue
Dengue 
मुंबई

जव्हारमध्ये डेंगुने घेतला दोघांचा बळी

भगवान खैरनार

मोखाडा : जव्हार तालुक्यातील बाळकापरा गावात नोव्हेंबर महिन्यापासून डेंगूने थैमान घातले आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात एका तरूणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोग्ययंत्रणा खडबडून जागी झाली होती आणि तेथे उपाययोजना सुरू केली होती. मात्र, त्यानंतर ही नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या धवळी देऊ भोये (वय 43), व बाळकापरा गावात रावजी मावंजी गोंड (वय 60) या दोघांचा शनिवारी (ता. 9) मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाळकापरा गावात खळबळ उडाली असून आदिवासींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जव्हारमधील बाळकापरा गावात नोव्हेंबर महिन्यापासून डेंगुची साथ आली आहे. डेंगुला आळा घालण्यासाठी या ठिकाणी आरोग्य विभागाने तपासणी शिबीर आयोजित केले आहे. तसेच तेथेच डॉक्टर तळ ठोकून आहेत. मात्र, तरीही डेंगुचे रूग्ण आढळून येतात. धवळी देऊ भोये या महिलेस 15 दिवसांपूर्वी जव्हारच्या कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे तिची तब्येत खालावल्याने, तिला पुढील उपचारांसाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा शनिवारी (ता. 9) मृत्यू झाला. तसेच रावजी मावंजी गोंड यांसही डेंगुसदृश्य तापाने घेरले होते. त्यांच्यावर जव्हारच्या कुटीर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तब्येतीत सुधारणा झाल्याने रावजीला घरी सोडण्यात आले. मात्र, शुक्रवारी पुन्हा  ताप येऊ लागला आणि शनिवार त्यांचा मृत्यु झाला. 

दरम्यान, नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवडय़ात योजना अवतार (वय 21) या तरूणीचा असाच मृत्यू झाला होता. या घटनांमुळे बाळकापरा गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बाळकापरा गावात आरोग्य विभागाने डेंगुला आळा घालण्यासाठी उपाययोजना सुरू ठेवल्या आहेत. असे असताना लगतच्या डेंगाचीमेट, सुतारपाडा आणि कळमविहीरा या गावामध्येही तापाचे रूग्ण आढळून येत असल्याने तेथील नागरीकही धास्तावले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT