मुंबई

नवी मुंबई मेट्रो मे २०१९ पर्यंत ट्रॅकवर

गजानन चव्हाण

खारघर - सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समजल्या जाणाऱ्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील विलंब झालेल्या स्थानकाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत. मे २०१९ पर्यंत पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्य कार्यकारी के. के. वरखेडकर यांनी दिली. 

सिडकोने मे २०११ मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रकल्पाला सुरुवात केली. बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटर अंतरावर सुरू केलेला प्रकल्प डिसेंबर २०१४ मध्ये पूर्णत्वाला जाईल, असे जाहीर केले होते. पण कंत्राटदारांच्या आर्थिक डिवाळखोरीमुळे सात वर्षे विलंब झाला. त्यामुळे सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन ही अर्धवट आहेत. ११ किलोमीटरमधील ११ स्थानके बांधण्याचे काम सॅनहोज, महावीर व सुप्रिम या कंत्राटदारांना दिले. सॅनहोज कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली कामे महावीर व सुप्रिम कन्स्ट्रक्‍शन कंपनी विभागून करत आहे. 

कंट्रोल रूम आणि डेपोचे काम पूर्ण
मेट्रोसाठी तळोजा येथे २६ हेक्‍टर जागेवर १३२ कोटी खर्चून डेपो विकसित केले आहे. त्यात कारशेड, डब्यांची स्वच्छता, दुरुस्ती आदी कामांची यंत्रणा उभारली जाणार आहे. बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटरच्या मेट्रो मार्गातील नऊ किलोमीटर मार्गातील रूळ टाकण्याचे काम आणि कंट्रोल रूमचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर तीन डब्यांच्या आठ गाड्या धावणार आहे. त्यासाठी २४ डबे लागणार आहेत.

नवी मुंबई मेट्रोच्या कामातील डेपो, कंट्रोल रूमचे काम पूर्ण झाले आहे. रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. स्थानकाच्या कामाचे नव्याने निविदेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मे २०१९ पर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे.  
-  के. के. वरखेडकर, मुख्य कार्यकारी अभियंता, 

उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू 
तळोजा-पाचनंद येथे कोकण रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल हे एक मोठे आव्हान आहे. रेल्वेने या उड्डाणपुलाला परवानगी दिल्यामुळे काम वेगात सुरू आहे. हा पूल कोणत्याही खांबाशिवाय (स्टे केबल ब्रिज) उभारला जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT