File photo of Radhakrishna Vikhe Patil
File photo of Radhakrishna Vikhe Patil 
मुंबई

पोलिसांच्या हेरगिरीविरोधात विखेंची राज्यपालांकडे तक्रार

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या निवासस्थानी पोलिसांनी हेरगिरी केल्याबद्दल राज्यपालांकडे लेखी तक्रार केली आहे. 

विखे-पाटील यांनी गुरुवारी (ता. 25) आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे पोलिस माहिती घेत असल्याचे आणि पत्रकारांची छायाचित्रे काढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. यासंदर्भात विखे-पाटील यांनी काल राज्यपालांना पत्र दिले आणि गृहखात्याविरुद्ध चौकशी व कारवाईचे निर्देश देण्याची मागणी केली. 

''पोलिसांनी केलेला प्रकार अत्यंत गंभीर आणि लोकशाहीला काळिमा फासणारा आहे. पोलिसांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय निवासस्थानी विनापरवानगी प्रवेश करणे, पत्रकारांची छायाचित्रे काढणे, हा प्रकार अत्यंत संतापजनक, निषेधार्ह आणि घटनात्मक पद असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या मूलभूत हक्कांचा भंग करणारा आहे. या सरकारचा संविधानावर व लोकशाहीवर विश्वास आहे की नाही, असा गंभीर प्रश्‍न यातून उपस्थित होत असून, ही बाब संविधान, लोकशाही, प्रजासत्ताक ही मूल्ये नाकारण्यासारखीच आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना त्याच दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेत्याला अशा लोकशाहीविरोधी प्रकारासंदर्भात राज्यपालांकडे दाद मागावी लागते, हे अत्यंत क्‍लेशदायक आहे, असे विखे-पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT