Mumbai
Mumbai 
मुंबई

मुंबई - घरफोडीतील चोरीस गेलेले मोबाईल केले हस्तगत

दिनेश चिलप मराठे

मुंबई : डोंगरी पोलिसांनी अवघ्या तीन आठवड्यात कसोशिने तपास करीत घरफोडीतील चोरीस गेलेले मोबाईल आणि अन्य सहित्यासह जवळपास 1 लाख 97 हजार 770 रुपये किमतीचे 22 मोबाईल, 7 पेंड्राईव, 7 मेमरी कार्ड हस्तगत केले.

या संदर्भात डोंगरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 4 जानेवारीच्या पहाटे डोंगरी नुरबाग येथील आमीर बिल्डिंग मधील तळाला असलेल्या दुकानाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दुकानातील 2, 34, 670 रूपयांची मालमत्ता चोरुन नेली. सदर घटनेची तक्रार दुकानदार प्रथमेश जैन यांनी डोंगरी पोलिसांत दिल्या नंतर तपास सुरु झाला.

उपायुक्त डॉ.मनोज कुमार शर्मा एसीपी मंगेश पोटे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक शशिकांत पाडावे, अन्वेषण अधिकारी प्रकाश दिनकर, हवलदार साळुंखे, थोरात, कदम, मुल्ला,गाढ़वे यांनी तांत्रिक बाजूने तपास करीत असता त्यांना मिळालेल्या माहितीचा माग काढत चोरी करणाऱ्या सोहेल राजा शेखसह विधिसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले. अधिक तपास करता या दोघांनी चोरी केल्याचे कबुल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT