मुंबई

PMC चा आणखी एक बळी; फतोमल पंजाबी यांना हृदयविकाराचा झटका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच PMC बँकेत पैसे अडकल्याचा धसका घेत आता आणखी एकाने आपला जीव गमावलाय. फतोमल पंजाबी अस खातेदाराचं नाव आहे. फतोमल पंजाबी याचं मुंबईतील मुलुंडमधील शाखेत खातं असल्याचं आता समोर येतंय. PMC खातेधाराकाचा चोवीस तासातील हा दुसरा मृत्यू आहे. पंजाबी यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झालाय. 

पंजाबी, याचं PMC बँकेच्या मुलुंड शाखेत खातं होतं. गेल्या काही दिवसापासून पंजाबी यांनी PMC बंकेविरोधातील अनेक आंदोलनांमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. आज पंजाबी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. PMC बँकेतील खातेधाराकांवर पैसे काढण्यासाठी निर्बंध लादण्यात आलेत. याच पार्शभूमीवर आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल पंजाबी यांनी आपल्या मित्रांशी चर्चादेखील केली होती.   

दरम्यान, या आधी PMC बँक खातेदार संजय गुलाटी यांचा मृत्यू झालाय. सोमवारी मुंबईत किला कोर्टासमोर झालेल्या रॅलीनंतर संजय गुलाटी अंधेरीच्या घरी गेले. जेवल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं म्हणून त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. बॅंकेत पैसे अडकल्याने ते देखील त्रस्त होते.

WebTitle : marathi news one more PMC account holder died due to heart attack second death in last twenty four hours   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT