Accident
Accident 
मुंबई

कल्याण-अहमदनगर महामार्गावर अपघात

नंदकिशोर मलबारी

सरळगाव (ठाणे) : कल्याण-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर बापसई गावाजवळ बोलेरो व भाजीपाला वाहतूक करणारी पिक अप यांच्यात झालेल्या अपघातात 1 ठार तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व प्रवासी मुरबाड-सरळगाव येथील असल्याची माहीती मिळाली. 

घटनेची मिळालेली माहीती अशी की सरळगाव येथून एका कंपनीच्या कामासाठी बोलेरो जीप रोज कल्याण येथे जाते. या जीप मधून हे सर्व प्रवासी प्रवास करीत होते. सकाळी नेहमीप्रमाणे बोलेरो जीप प्रवासी घेऊन कल्याणकडे जात होती. याच वेळी मुरबाड तालुक्यातील धसई येथील भाजीपाला वाहतूक करणारी पिकअप कल्याण कडून मुरबाडकडे येत होती. या दोन्ही वाहनांची कल्याण-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील बापसई गावा जवळ समोरा-समोर धडक झाली. या धडकेत प्रदिपकुमार जियालाल सरोज (मुरबाड) हे जागेवर ठार झाले, तर बोलेरो गाडीतून प्रवास करणारे भालचंद्र माळी, नामदेव व्यापारी, महेश घूडे, दिपक घोडे, राजेश पवार, जियाराम सरोज, सचिन बांगर व पष्टे हे गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. बोलेरोचा जखमी चालक रिशांत धनगर हा गोवेली येथील रूग्णालयात उपचार घेत आहे. तर पिकअपचा चालक मात्र जखमी अवस्थेत पळून गेला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT