Ulhasnagar
Ulhasnagar 
मुंबई

निसर्ग आणि निसर्गातील घरे रेखाटण्यात रमले उल्हासनगरातील विद्यार्थी

सकाळवृत्तसेवा

उल्हासनगर : सकाळने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत उल्हासनगरातील विद्यार्थ्यांनी निसर्ग आणि निसर्गातील घरे चित्तारून पर्यावरणाचा लक्षवेधक संदेश दिला.

उल्हासनगर कॅम्प नंबर 1 मधील गुन्हे अन्वेषण शाखेच्या मागे असलेल्या महाराष्ट्र मित्र मंडळाच्या शाळेत अ, ब, क, ड अशा चार गटातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन दैनिक सकाळच्या वतीने करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्र मित्र मंडळ आणि सेंच्युरी रेयॉन या शाळेतील अ गट-17, ब गट-32, क गट-127 आणि ड गट-108 असे 284 विद्यार्थी सहभागी झाले होते.

अ-ब गटात (इयत्ता पहिली ते चौथी) माझे घर, माझे आवडते खेळणे, माझी शाळा, माझा मोबाईल, वन लाईफ,लव्ह ईट, ब गटात-, क गटात (इयत्ता 5 वि ते 7 वि) माझा आवडता सण,जंगल,रस्तासुरक्षा,भाजीवाला/भाजी मंडई,वनलाईफ,लव्ह ईट,ड गटात (इयत्ता 8 वि तेे 10 वि) शाळेच्या प्रयोग शाळेत,पावसातील दृश्य,कॅम्पफायर/शेकोटी,वनलाईफ,लव्हईट हे विषय चित्रकलेसाठी देण्यात आले होते.महाराष्ट्र मित्र मंडळाचे विश्वस्त विजय कुलकर्णी,रवी ओझा,शशिकांत सावंत यांच्या सहकार्याने शाळेचे शिक्षककैलास बालोडे, योगेश पाटील, संदेश भिलमाला, शुभांगी ओव्हाळ, सकाळ प्रतिनिधी प्रविण गुंजाळ,हर्षल फडणीस यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पिनड्रॉप शांततेत पार पडली.बच्चे कंपनीला स्पर्धेसाठी घेऊन आलेल्या आणि प्रतीक्षेत शाळेच्या आवारात बसलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर देखील उत्कंठा दिसत होती.

या स्पर्धेत इयत्ता 1 ली ते 10 वि पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग आणि निसर्गातील घरे चित्तारण्याला अधिक प्राधान्य दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update: "काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

'यशवंत'ची 300 एकर जमीन 56 कोटींना विकून संजय पाटलांनी मालमत्ता कमावली; विशाल पाटलांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT