मुंबई

नागपाडा येथील चायना इमारतीला भीषण आग..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नागपाडा येथील कामाठीपुरा परिसरातील चायना या इमारतीत सोमवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीत एक दोन वर्षीय चिमुकलीसह आठजण जखमी झाले आहेत. यात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.          

कामाठीपुरा या अत्यंत गजबजलेल्या परिसरातल्या बगदादी कंपाउंडमधील चायना ही व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीच्या तळ व पहिल्या मजल्यावर सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीत लेदर व कपडे यांची गोदामे असल्याने आग काही क्षणात भडकली व आग लेवल दोनची झाली. १० नंतर ही आग आणखी भडकत जाऊन आगीची लेवल तीनची झाली. दाटीवाटीच्या वसाहतीत असलेल्या या इमारतीतील आगीचा धूर परिसरात पसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आगीचा पसरलेल्या  धूरामुळे बाहेर पडता न आल्याने काहीजण इमारतीत अडकले. एका लहान मुलासह ८ जण  अग्निशमन दलाने तात्काळ बाहेर काढले. धुरामुळे श्वास कोंडून त्रास व्हायला लागल्याने त्यांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे. एकाची प्रकृती चिंताजनक असून उर्वरित जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जखमींची नावे -
अनिया (२), चांदणी शेख (२५), निशा देवी (३२), मोहनराम (७०), आदिल कुरेशी (२०), रंजना देवी ( २४)  नेहा कुरेशी (२७) चंदा देवी ( ६०)

दरम्यान, आगीमुळे इमारतीचा काही भाग कोसळला तर काही भागाला तडे गेले. आगीत तळमजला व पहिल्या मजल्यावरील गोदामे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वायरिंग , व्यवसायिक गाळे जळाले. दरम्यान तब्बल चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आग कशामुळे लागले याचे कारण अद्याप समजू शकलेले नसून तपास सुरु असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.  

WebTitle : massive fire in mumbai kamathipura area eight injured


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT