maternity case at rukminibai hospital medical officer in KDMC Dr Trunali mahatekar suspended esakal
मुंबई

Mumbai News : रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रसूती प्रकरण; केडीएमसीतील वैद्यकीय अधिकारी डॉ. तृणाली महातेकर निलंबित

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील रुक्मिणीबाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. तृणाली महातेकर यांना पालिका प्रशासनाने निलंबित केले

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील रुक्मिणीबाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. तृणाली महातेकर यांना पालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. काही महिन्यांपूर्वी सदर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका फिरस्ता गरोदर महिलेला उपचारासाठी दाखल करून न घेता तिला अन्यत्र जाण्याची सूचना डॉ. महातेकर व अन्य कर्मचाऱ्यांनी दिली होती.

याप्रकरणी चौकशी समितीने डॉ. महातेकर यांनी निष्काळजीपणाचा दाखविल्याचा ठपका ठेवला होता. अखेर पालिका प्रशासनाने याप्रकरणी कारवाई केली आहे. कल्याण येथील स्कायवॉक वर एका फिरस्ता महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्याने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस व काही महिलांनी सदर महिलेला उपचारासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आणले होते.

मात्र या महिलेला रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रोखून ठेवले होते. याठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. तुम्ही या महिलेला प्रसूतीसाठी अन्य रुग्णालयात घेऊन जा, असे कर्मचारी सांगत होते.

या महिलेला तात्पुरते दाखल करून पहिले उपचार सुरू करा, अशी मागणी पोलीस करत होते. रुग्णालयात त्यावेळी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. महातेकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी फिरस्ती महिलेला दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. दरम्यान सदर महिला ही रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावरच प्रसूत झाली होती. सप्टेंबर महिन्यात ही घटना घडली होती.

प्रसूती कळा सुरू असलेल्या एका महिलेला दाखल करून घेण्यास पालिका रुग्णालयाने टाळाटाळा केल्याने सर्व स्तरातून पालिका अधिकाऱ्यांवर टीका झाली होती. पालिकेने सुरवातीला सदर महिलेला वसंत व्हॅली येथे जाण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली होती. तसेच ती प्रसूत झाल्यानंतर तिला योग्य उपचार देण्यात आले होते असे सांगत या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे सांगितले होते.

आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड, आमदार राजू पाटील यांनी ही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. पालिकेने अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने या प्रकरणात घटना घडली त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या डाॅ. महातेकर यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला होता.

चौकशी समितीने दिलेल्या निष्कर्षवर पालिका प्रशासनाने डॉ. महातेकर यांच्यावर निलंबिणाची कारवाई केली आहे. निलंबन काळात डाॅ. महातेकर यांना दररोज पालिका मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Monsoon Arrival Maharashtra : मॉन्सून आगमनाची तारीख बदलली, ८ ते १० जूनदरम्यान महाराष्ट्रात पाऊस; शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT