Matheran Toy Train 64 lakhs revenue of Railways mumbai tourism google
मुंबई

Matheran Toy Train : शंभर वर्षे जुनी माथेरानचा राणी सुसाट

अवघ्या सहा महिन्यात ५४ हजार तिकिटांची विक्री; मध्य रेल्वेची ६४ लाखची कमाई!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची राणी असलेली मिनीट्रेनला पर्यटकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सहा महिन्यात माथेरानचा राणीची ५३ हजारपेक्षा जास्त तिकिट विक्री केली आहेत. त्यामधून ६४ लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल मध्य रेल्वेने गोळा केला आहेत.

माथेरान हे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मध्य रेल्वेने नेरळ आणि माथेरान दरम्यान प्रवाशांसाठी रेल्वेची शटल सेवेसह हे ठिकाण एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नेरळ-माथेरान मिनी ट्रेन २२ ऑक्टोबर २०२२ रोजी पुन्हा सुरू झाली.

तेव्हापासून निसर्गाचा आनंद लुटण्याचा आनंद देणार्‍या मिनी ट्रेनमधून प्रवासी या छोट्याशा हिल स्टेशनवर दाखल झाले आहेत. ऑक्टोबर २०२२ ते २३ मार्च २०२३ पर्यत मिनी ट्रेनच्या ५३ हजार ४७० तिकीट विक्री झाली आहे. यातून मध्य रेल्वेला ६४ लाख ९९ हजार ९१ रुपयांचा महसूल गोळा केला आहेत.

माथेरान- नेरळ

महिला- तिकीट - महसुल

  • ऑक्टोंबर - २०६०- २,६०,०१०

  • नोव्हेंबर - ५७९१-६,०३,०७०

  • डिसेंबर - ५८०४- ६,५४,८३२

  • जानेवारी - ५२६६- ५,७७,०२२

  • फेब्रुवारी - ३५५६-३,६२,०७२

  • २३ मार्च - २४६३- २,४९,८४५

नेरळ ते माथेरान

महिला- तिकीट - महसुल

  • ऑक्टोंबर -२०७३- २,८३,३७०

  • नोव्हेंबर -५४१७-७,३२,८८०

  • डिसेंबर -६०७१- ८,९१,९१०

  • जानेवारी -६८१४- ८,२५,२४०

  • फेब्रुवारी -४८१६ -६०४,३२०

  • २३ मार्च -३३३९- ४,५३,९२०

१०० वर्षांहून अधिक जुनी ट्रेन

मुंबई, पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. नेरळ-माथेरान टॉय ट्रेन, जी १०० वर्षांहून अधिक जुनी आहे, ही भारतातील काही पर्वतीय रेल्वेंपैकी एक आहे.

वर्ष २०१९ मध्ये मुसळधार पावसामुळे वाहून गेलेला नेरळ-माथेरान ट्रॅक पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेने जोरदार प्रयत्न केले आहेत. नेरळ ते अमन लॉजपर्यंत पर्वतांना वळसा घालणारी नॅरोगेज लाईन अखेर तयार झाली आणि या मार्गावरील सेवा २२ ऑक्टोबर २०२२ रोजी पुन्हा सुरू करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT