mayor
mayor esakal
मुंबई

Mumbai Fire: जखमींवर उपचार करण्यास 2 रुग्णालयांचा नकार, महापौर संतापल्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ताडदेव परिसरातील नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला (kamala building) आग लागल्याचे समजते. माहितीनुसार ही आग सकाळी साडेसातच्या सुमारास लागली. इमारत 20 मजली इमारत असून याच्या 18 व्या मजल्यावर ही आग लागलीय. दरम्यान, मुंबईतील 2 नामांकित रुग्णालयांनी आगीत होरपळलेल्या जखमींवर उपचार करण्यास नकार दिला. यावरून महापौर किशोरी पेडणेकर (mayor kishori pednekar) यांनी संताप व्यक्त केला आहे. आग दुर्घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. या जखमींना भाटिया रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. यापैकी 3 जण अत्यवस्थ आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे

२ रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यास नकार

कमला इमारत आग दुर्घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. या जखमींना भाटिया रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. यापैकी 3 जण अत्यवस्थ आहेत. जखमींना वाचवल्या नंतर वॉक्हार्ट आणि रिलायन्स रुग्णालयात घेऊन गेले असता, या दोन्ही रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे भाटिया रुग्णालयातच या जखमींना दाखल करावं लागलंय. त्यामुळे नकार देणाऱ्या या दोन्ही रुग्णालयावर कारवाई करण्यास आयुक्तांना आपण सांगणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत

आगीत 18 जण जखमी, भाटिया रुग्णालयात दाखल

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी पावणे आठच्या सुमारास आग लेव्हल 3 ची होती. या आगीत 18 जण जखमी झाले असून त्यांना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन व 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT