Railway line
Railway line sakal
मुंबई

मुंबईच्या तिनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लाॅक!

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य,हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी (Megablock) रविवारी (ता.27) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येईल. यावेळी सकाळी 11.00 ते दुपारी 4.30 या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्स हार्बर आणि मुख्य रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी दिल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने (central railway) सांगितले आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.(Mega block on sunday three railway line track repairing issue)

कुठे : माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाउन जलद मार्गावर

कधी : सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 दरम्यान

परिणाम : ब्लाॅकदरम्यान माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व माटुंगा ते मुलुंड दरम्यान त्यांच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील. या गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील आणि नियोजित वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटे उशीराने गंतव्यस्थानी दाखल होतील.

कुठे : हार्बर मार्गावर मानखुर्द - नेरूळ अप व डाउन

कधी : सकाळी 11.15 ते सांयकाळी 4.15 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकवेळी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर / वाशी अप आणि डाऊन दिशेकडील लोकल रद्द केल्या आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते मानखुर्द विभागात विशेष सेवा चालविल्या जातील.

कुठे : मरीन लाईन्स ते माहिम डाऊन धिम्या मार्गावर

कधी : सकाळी 10.35 ते दुपारी 3.35

परिणाम : या ब्लाॅक कालावधीमध्ये मरीन लाईन्स ते माहिम डाऊन धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड या स्थानकावर फलाटाअभावी लोकल थांबणार नाही. तर, 15 डब्याच्या लोकलसाठी लोअर परळ, माहिम स्थानकात डबल हाॅल्ट दिला जाणार आहे. तर, अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT