Metro-City-job-journey-tired
Metro-City-job-journey-tired 
मुंबई

नोकरी-प्रवासात दमली मेट्रो सिटीतील आई!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  - ‘मेट्रो’ शहरात राहणे आपण प्रतिष्ठेचे मानतो; परंतु इथली आई रोजचा प्रवास आणि नोकरी-व्यवसायात रमण्यापेक्षा दमत चालली आहे. कामाच्या व्यापामुळे ती सतत तणावात असून विविध पातळ्यांवर लढताना ती मुलांना पुरेसा वेळही देऊ शकत नसल्याचा निष्कर्ष ‘मॉम्स हॅपीनेस इंडेक्‍स’च्या सर्वेक्षणातून पुढे आला आहे. त्या तुलनेत छोट्या शहरांतील आई आनंदी असून मुलांचे पालनपोषण आणि त्यांना शिस्त लावण्यामध्ये त्यांना त्यांचे पती व कुटुंबातील सदस्यांचा आधार मिळत आहे.

‘मॉम्सप्रेसो डॉटकॉम’ कंटेन्ट मंचाद्वारे देशभरातील मातांना आनंद देणाऱ्या बाबी जाणून घेण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात दोन हजार २० महिलांचा सहभाग होता. सर्वेक्षणादरम्यान मी किती चांगली आई आहे? माझे पती किती आधार देतात? मला माझ्यासाठी किती वेळ आहे? मी आर्थिकदृष्ट्या किती सशक्त आहे? माझी सासरची मंडळी किती आधार देतात? आदी प्रश्‍न प्रामुख्याने विचारण्यात आले होते. 

मेट्रो सिटीतील ५५ टक्के मातांच्या तुलनेत छोट्या शहरांतील ६६ टक्के आई आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा आपल्या पतीसोबत उत्तम वेळ व्यतीत करतात. छोट्या शहरातील शहरांतील ७२ टक्के मातांना त्यांच्या मुलांना शिस्त लावण्यात त्यांच्या पतीचे सहकार्य मिळते. मेट्रो शहरांत त्याचे प्रमाण ६३ टक्के आहे. मेट्रो सिटीतील ५६ टक्के मातांच्या तुलनेत छोट्या शहरांतील ६९ टक्के मातांचे वैवाहिक जीवन सुखी आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्या मातांच्या तुलनेत छोट्या शहरांतील मातांना घरातील कामांसाठी सासरच्या मंडळींकडून जास्त सहकार्य मिळते. मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी आणि आवडत्या गोष्टी करण्यासाठी वेळ काढण्याचा मातांचा प्रयत्न असतो, असे सर्वेक्षणात सांगण्यात आले.

मॉम्स हॅपीनेस इंडेक्‍स २०१९ द्वारे निर्धारित केलेल्या भारतीय मातांच्या मुख्य तणावाच्या कारणांमध्ये मुलांची सुरक्षा, इंटरनेट व गॅझेट्‌सचा वापर, खाण्याच्या सवयी, शिस्त आणि अभ्यास यांचा समावेश होता.

भारतीय मातांच्या सुखाचे विविध निदर्शक समजून घेण्यासाठी मॉम्स हॅपीनेस सर्वेक्षण महत्त्वाचे साधन आहे. यंदाच्या सर्वेक्षणानुसार मेट्रो आणि छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या मातांचा आनंद त्यांच्या आयुष्यातील निरनिराळ्या सदस्यांच्या सहकार्यावर अवलंबून असतो, हे निर्दशनास आले. 
- विशाल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी,  मॉमस्प्रेसो डॉटकॉम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT