Mumbai
Mumbai sakal
मुंबई

म्हाडा भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध संवर्गातील 565 रिक्त पदे भरण्याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीला उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या परीक्षेचे वेळापत्रक म्हाडा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार भरतीची परीक्षा 5 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

म्हाडा भरतीमधील विविध 14 संवर्गातील पदांसाठी पावणे तीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यापैकी अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे म्हाडाने विविध पदांसाठीची परीक्षा एकाच दिवशी आयोजित न करता विविध क्लस्टरमध्ये परीक्षांचे नियोजन केले आहे. या परीक्षेचे वेळापत्रक म्हाडाने जाहीर केले आहे. 5 डिसेंबर रोजी क्लस्टर 7 मधील लघुटंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक रोजी सकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आली आहे. तर 12 डिसेंबर रोजी क्लस्टर 1 मधील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य) आणि क्लस्टर 3 मधील सहायक विधी सल्लागार या पदांची परीक्षा सकाळच्या सत्रात आयोजित केली आहे. तसेच 12 डिसेंबर रोजी क्लस्टर 4 मधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीची परीक्षा दुपारच्या सत्रात आयोजित केली आहे.

वेळापत्रक जाहीर केलेल्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना म्हाडाच्या संकेतस्थळावरून हॉल तिकीट डाउनलोड करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. याची सूचना उमेदवारांच्या मेल आयडी आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.

उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

एकाहून अधिक पदांच्या परीक्षांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी देण्यासाठी म्हाडाकडून विविध क्लस्टरमध्ये परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. म्हाडाने 4 क्लस्टरमधील उमेदवारांची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इतर क्लस्टरमधील उमेदवारांच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर येईल, असे म्हाडा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT