वसई ः सायमन मार्टिन
वसई ः सायमन मार्टिन 
मुंबई

वसईत शिवसेनेतर्फे अल्पसंख्याक उमेदवार!

सकाळ वृत्तसेवा

विरार ः बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या गडाला भेदण्यासाठी आता वसई अल्पसंख्याक उमेदवाराला निवडणुकीत उतरविण्याशिवाय पर्याय नसल्याने शिवसेनेने आपला नवीन चेहरा उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ख्रिश्‍चन समाजातील साहित्यिक, कवी सायमन मार्टिन यांच्यामागे पक्षाने आपली ताकद उभी करण्याचे ठरविले असून त्याची बांधणीही करण्यास सुरुवात केली आहे.

सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेची जागा जिकल्यानंतर आता विधानसभेवर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वसईमधून साहित्यिक, कवी सायमन मार्टिन यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि सायमन मार्टिन यांच्यात चर्चा झाल्यानंतर सायमन मार्टिन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या संदर्भात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची मते जाणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतल्यावर शिवसैनिकांनीही याला होकार दिल्याने वसईमधून हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात सायमन मार्टिन अशी लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

राजकारणापलीकडचा चेहरा म्हणून सायमन मार्टिन यांना निवडणुकीत उतरविण्यात येणार आहे. वसईमध्ये आजच्या घडीला ख्रिश्‍चन समुदायाची ८० हजार मते असून त्याला युतीच्या मतांची जोड मिळाल्यास ठाकुरांचा बालेकिल्ला ढासळू शकतो, असे यामागील गणित असल्याचे बोलले जात आहे.

१९९० नंतर ख्रिश्‍चन समुदायाचा उमेदवार!
शिवेसेनेतर्फे सायमन मार्टिन यांना दिल्या जाणाऱ्या उमेदवारीबाबाबत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. परंतु मार्टिन यांच्या निकटवर्तीयांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, डॉमनिक घोन्साल्विस यांचा १९९० मध्ये पराभव झाल्यापासून ख्रिश्‍चन समुदायाला कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. शिवसेना आता आमच्या माणसाला उमेदवारी देणार असल्याने आम्ही खूश आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT