मुंबई

'टॉप्स सिक्युरिटीज'कडून कोणताही घोटाळा नाही; MMRDA च्या अहवालाने प्रताप सरनाईक यांना दिलासा

सुमित बागुल

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळालाय. MMRDA ने टॉप्स कंपनीबाबत आता स्पष्टीकरण दिले आहे. टॉप्स कंपनीवर लावण्यात आलेले आरोप तथ्यहीन असल्याचं MMRDA ने आपल्या अहवालात नमूद केले आहे. टॉप्स कंपनीकडून MMRDA ला पाचशे कंत्राटी सुरक्षारक्षक दिले जात होते. मात्र या पाचशे कंत्राटी सुरक्षा रक्षकांमधील केवळ सत्तर टक्केच सुरक्षारक्षक कामावर येत होते. अशात सर्व सुरक्षा रक्षकांचे वेतन निघत असल्याचा आरोप आर्थिक गुन्हे शाखेने आपल्या FIR मध्ये केला आहे.

दरम्यान, आता MMRDA कडून सादर करण्यात आलेल्या अहवालात Tops Securities वर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं म्हंटलं आहे. टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात रमेश अय्यर यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली, प्रताप सरनाईक यांच्या मुलाची देखील ED मार्फत चौकशी करण्यात आली. सोबतच अमित चंडोले यांना अटक देखील झाली.

काय आहे MMRDA च्या अहवालात ?

  • MMRDA च्या निविदा प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला होता. 
  • या निविदा प्रक्रियेतील सहा कंपन्यांना मान्यता देण्यात आलेली. 
  • टॉप्स कंपनीला देखील या निविदा प्रक्रियेत मान्यता देण्यात आलेली.
  • निविदा प्रक्रियेत नमूद केल्याप्रमाणे टॉप्स कंपनीने सुरक्षा रक्षक पुरवलेत आणि त्यांना निविदा प्रक्रियेप्रमाणेच निधी देखील देण्यात आला आहे.  
  • गैरहजर सुरक्षा रक्षकांवर कारवाई देखील केली गेली आणि त्यांच्याकडून दंड देखील आकारण्यात आला.  

MMRDA कडून सादर करण्यात आलेल्या अहवालामुळे प्रताप सरनाईक यांना दिलासा मिळाल्याचं बोललं जातंय. प्रताप सरनाईक यांची ED मार्फत चौकशी झाल्यानंतर सरनाईक यांनी यापुढेही ED ला चौकशीत सहकार्य करणार असल्याचं म्हटलंय. आपल्याला ED ने परत बोलावल्यास दोन तासात चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे सरनाईक म्हणालेत. 

mmrda submits report in regards with tops securities big relief to pratap sarnaik shivsena MLA

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT