raj-thackeray.jpeg
raj-thackeray.jpeg 
मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं महत्त्वाचं आवाहन 

दीनानाथ परब

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने हे अभियान सुरु राहणार आहे. स्वत: राज ठाकरे यांनी आज शिवाजीपार्कमध्ये कुटुंबीयांसोबत या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात केली. या सदस्यनोंदणी अभियानाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील लोकांना राजकारणात येण्याचे आवाहन केले. पुढच्यावर्षी २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक ताकत आणि जनाधार भक्कम करण्याच्या दृष्टीने या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झालीय. 

विविध क्षेत्रातील क्रियाशील, सृजनशील आणि तज्ज्ञांनी राजकारणात यावे, असे आवाहन राज ठाकरेंनी केले. मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी नागरिकांनी https://mnsnondani.in या संकेतस्थळावर जावे किंवा ऑफलाइन नोंदणीसाठी जवळच्या पक्ष कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. 

ऑनलाइन वेबसाइटवर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचा पर्याय आहे. मनसेचा सदस्य होण्यासाठी नाव, पत्ता, फोटो आणि संपर्क क्रमांकाची माहिती भरावी लागेल. फॉर्ममध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षाचे सदस्य आहात का? हे विचारण्यात आले असून, दोन वर्ष २०२१ ते २०२३  साठी मनसेचे सदस्यत्व मिळणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT