मनसेने टिकुजिनीवाडी येथील रस्त्यावर रेखाटलेले व्यंगचित्र. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
मनसेने टिकुजिनीवाडी येथील रस्त्यावर रेखाटलेले व्यंगचित्र. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे) 
मुंबई

ठाण्यातील खड्ड्यांवरून मनसेचे खळळ्‌खट्याक 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : मुसळधार पावसाने ठाण्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरातील अनेक डांबरी रस्ते खड्ड्यात गेले आहेत.  पादचारी आणि वाहनचालक रोजच हैराण होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिकेच्या बांधकाम विभागाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसेने टिकुजिनी वाडीतील रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये चक्क मंत्र्यांच्या प्रतिमा ग्राफिटीद्वारे रंगवून अभिनव आंदोलन छेडले. खड्ड्यांचा कल्पकतेने वापर करून मनसेने रंगवलेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमा ठाणेकरांमध्ये चर्चेचा विषय ठरल्या होत्या.

सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे ठाण्यातील खड्डे, त्यांचा आकार, त्यांची  संख्या आणि पर्यायाने अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. वाहनचालकांना आणि नागरिकांना त्रास होत असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे सोयरसुतक ना ठाणे पालिकेला ना सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना. तेव्हा रस्त्यावरील अगणित खड्ड्यांची जाणीव पालिका प्रशासन आणि सरकारला व्हावी, याकरिता मनसेने खड्ड्यांमध्ये मंत्र्यांच्या प्रतिमा ग्राफिटीद्वारे रंगवल्या. एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमा खड्ड्यांभोवती रेखाटून मनसेने सत्ताधाऱ्यांवर केलेल्या कलात्मक टीकेची चर्चा दिवसभर रंगली होती. 

मनसे विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली मनसे उपशहरप्रमुख पुष्कर विचारे, प्रभाग अध्यक्ष अमोल राणे आणि मनसे शाखाध्यक्ष सागर भोसले यांनी बुधवारी टिकुजिनी वाडीतील निळकंठ ग्रीन परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यात चक्क एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमा ग्राफिटीद्वारे रेखाटल्या. भररस्त्यात अशा प्रकारे दोन बड्या मंत्र्यांच्या हुबेहूब प्रतिमा खड्ड्यात चितारल्याने सारेच अवाक्‌ झाले.

खड्ड्यांची जबाबदारी कोणाची?
ठाणे पालिकेने कोट्यवधी रुपयांचा निधी रस्ते दुरुस्तीसाठी राखीव ठेवला आहे. तरीही रस्त्यात खड्डे कायम असतील तर त्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्‍नही मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. मनसे रस्त्यावरील खड्ड्यांवरून आक्रमक झालेली असताना त्या विषयावर सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात मात्र शांतता होती. मनसेच्या आंदोलनाची कुणकुण कोणालाच न लागल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. रस्त्यांवर खड्डे पडले की, सत्ताधाऱ्यांना डिवचण्यासाठी विरोधी पक्ष विविध प्रकारचे आंदोलन करतच असते. मात्र, मनसेचे आंदोलन अनोखे ठरले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT