MNS leader Nitin Sardesai s inquiry by ED
MNS leader Nitin Sardesai s inquiry by ED  
मुंबई

मनसेचे नितीन सरदेसाई यांची 'ईडी'कडून चौकशी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मनसेचे माजी आमदार आणि राज ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार नितीन सरदेसाई 'ईडी' कडून चौकशी करण्यात येत आहे. सरदेसाई हे आज सकाळीच चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणात ही चौकशी सुरू असल्याचे समजते आहे.

कोहिनूर मिल खरेदी-विक्री प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची 'ईडी'ने साडेआठ तास कसून चौकशी केली. यानंतर आता मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांची चौकशी सुरू आहे. सरदेसाई हे देखील कोहिनूर मिल व्यवहारातील भागीदार होते. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुका जवळ आहेत. अशातच कोहिनूर प्रकरणाची चौकशी 'ईडी'ने सुरू केली आहे. मनसेचे राज ठाकरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांच्यानंतर आता मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांची चौकशी करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि मनसेवर दबाव निर्माण करण्यासाठी ही चौकशी सुरू असल्याचं बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT