अल्पवयीन मुलीवर माणगावात अत्याचार
अल्पवयीन मुलीवर माणगावात अत्याचार 
मुंबई

अल्पवयीन मुलीवर माणगावात अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

माणगाव (वार्ताहर) : तालुक्‍यातील एका गावात आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा माणगावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना गुरुवारी (ता. १९) उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

संशयित दीपक ऊर्फ राज राजेश शर्मा (वय २५, मूळ रा. शिकारपुरा, मध्य प्रदेश, सध्या रा. नटराज हॉटेल, स्वारगेट) याने तालुक्‍यातील या मुलीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक साधली. तो त्या मुलीला भेटण्यासाठी माणगाव येथे आला. मुलगी १९ सप्टेंबरला सकाळी ११  वाजता घरातून निघून दीपक याला भेटली. या वेळी दीपक शर्मा याने तिला लग्नाच्या भूलथापा देऊन माणगाव येथील निजामपूर रोड येथील एका लॉजमध्ये अत्याचार केला. मुलगी घरी न आल्यामुळे मुलीच्या आईने पोलिसांकडे संपर्क साधला असता मुलीच्या मोबाईल लोकेशनद्वारे लॉजवर मुलगी पोलिसांना सापडली. मुलीने घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. याची तक्रार मुलीच्या आईने माणगाव पोलिस ठाण्याला दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT