Court
Court 
मुंबई

अल्पवयीन मुलाची मालमत्ता विकण्याचा अधिकार आईला नाही

सकाळवृत्तसेवा

मुंबई - वडिलांकडून वारसा हक्काने न मिळालेली, मात्र वडिलांनी अल्पवयीन मुलाच्या नावाने खरेदी केलेली मालमत्ता त्याची आई विकू शकत नाही. ती या मालमत्तेची केवळ पालक म्हणून सांभाळ करू शकते, असे सांगत यासंदर्भात झालेला विक्री करार उच्च न्यायालयाने नुकताच अयोग्य ठरवला.

१९८९ मध्ये कुशावर्तबाई पाल या महिलेने विक्री केलेल्या एका मालमत्तेबाबत १२ वर्षांच्या मुलाने उच्च न्यायालयात दावा दाखल करत हा करार अवैध ठरवावा अशी मागणी केली होती. या मालमत्तेचे हस्तांतर जबरदस्तीने झाले होते. त्यानंतर मालमत्तेची विक्री केल्याचा युक्तिवाद सुनावणीदरम्यान झाला होता. न्या. ए. एम. ढवळे यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. 

न्यायालयाने आदेशाची प्रत जमीन उपनिबंधकांकडे पाठवून विक्री करार रद्द केल्याचे कळवावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले.

जमीनविक्रीतून मुलाच्या खर्चाचे स्पष्टीकरण 
मुलाच्या भवितव्यासाठी जमिनीची विक्री केली. त्यातून आलेल्या पैशांतून मुलाचा शैक्षणिक व आर्थिक खर्च उचलल्याचे स्पष्टीकरण प्रतिवादी असलेल्या शिवाजी पाल यांनी केला. या विक्रीत कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले होते; जबरदस्ती झाली नव्हती, असा दावाही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: "काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT