palghar
palghar 
मुंबई

पालघर जिल्हयात मोटार बाईक अॅम्बुलन्स सेवा सुरू

सकाळवृत्तसेवा

मोखाडा - अतिदुर्गम पालघर जिल्हयात कुपोषणाला आळा घालण्यात शासनाला यश आलेले असतानाच तातडीने रूग्ण सेवा मिळावी म्हणून मोटार बाईक अॅम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागात देण्यात येणाऱ्या 5 अॅम्बुलन्स बाईक सेवेचे ऊदघाटन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते मोखाड्यात करण्यात आले आहे. ही अॅम्बुलन्स बाईक सेवा सामाजिक ऊत्तर दायित्व निधीतून ऊपलब्ध करून देण्यात आली आहे. तर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात आरोहन सामाजिक संस्था, सिमेन्स इंडिया आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोनोग्राफी मशीन चे लोकार्पण ही सावंत यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 

या ऊदघाटन आणि लोकार्पण कार्यक्रमाच्या वेळी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपण अॅम्बुलन्स बाईक सेवा लंडन मध्ये गेलो असता पाहीली होती. तेथे रहदारीत तातडीने रूग्ण सेवा मिळावी म्हणून त्याचा ऊपयोग केला जात आहे. ही सेवा राज्यातही सुरू व्हावी म्हणून प्रथम मुंबईत 10 मोटर बाईक अॅम्बुलन्स सेवा, प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे. त्याचा मोठा फायदा मुंबई त झाला आहे. त्यापाठोपाठ आता पालघरमध्ये 5 आणि मेळघाटात 5 या आदिवासी बहुल भागामध्ये अॅम्बुलन्स बाईक सेवा सुरू करण्यात आली असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, ही अॅम्बुलन्स सेवा देणारा चालक स्वतः डॉक्टर आहे. त्याच्या कडे प्रथमोपचाराबरोबरच तातडीने संदर्भ सेवेसाठी टॅब ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेने रुग्णाला तातडीने रूग्णालयात दाखल करता येणे शक्य होणार आहे. तर आदिवासी भागात औषधी वनस्पती असल्याने, या भागात वनौषधी पासून औषध बनवणाऱ्या कंपन्या आणण्याचा विचार असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच मोखाड्यात येत्या तीन महिन्यांत 28 खाटांचे बालरोग दक्षता कक्ष जिंदाल कंपनीच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहीती सावंत यांनी दिली आहे. तर आशा कार्यकर्ती च्या मानधनात वाढ करण्याचा शासनाचा माणस असल्याचे डॉ. दीपक सावंत यांनी सांगीतले आहे. 

मोखाड्यात पाणी टंचाई, स्थलांतराचा मोठा प्रश्न आहे. त्याला आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तर गोधडी आणि खुंटी प्रकल्पामुळे स्थलांतराला आळा बसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगीतले आहे. आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या सतर्कतेने पालघर जिल्हयातील कुपोषणाला आळा घालण्यात यश आले असून, कुपोषणाची टक्केवारी 1/3  कमी झाल्याचे नारनवरे यांनी सांगीतले आहे.

दरम्यान, सुदृढ बालक जन्माला यावे म्हणून आरोहन सामाजिक संस्था, सिमेन्स इंडिया लिमिटेड आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन सामाजिक ऊत्तर दायित्व निधीतून ऊपलब्ध करण्यात आली आहे. तीचे लोकार्पण आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमास आरोहन संस्थेच्या रिना जोसेफ, संचालिका अंजली कानिटकर, सिमेन्स इंडियाचे श्रीनिवासन, कोकण विभाग आरोग्य ऊपसंचालक रत्ना रावखंडे, पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम, मोखाड्याचे सभापती प्रदीप वाघ, नगराध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT