MSEDCL intensifies bill collection employees on streets in scorching heat
MSEDCL intensifies bill collection employees on streets in scorching heat Sakal
मुंबई

MSEDCL : आठवडे बाजाराची संधी साधून महावितरणची वसुली, रणरणत्या उन्हात वीजबील वसुलीसाठी कर्मचारी रस्त्यावर

भगवान खैरनार

मोखाडा : आर्थिक वर्षअखेरीला थकीत वीजबील वसुलीचे आव्हान महावितरणपुढे ऊभे ठाकले आहे. थकीत वीजबील वसुलीसाठी महावितरणने वेगवेगळे फंडे वापरले आहेत. समाज माध्यम, वाहनावर ध्वनिक्षेपकावरुन, घरोघरी जाऊन आणि आता आठवडे बाजारात फिरून वीजबील वसुली, मोहीम महावितरणने सुरू केली आहे.

त्यासाठी कर्मचार्यांना कामाला लावले आहे. अधिकारी मात्र, कार्यालयात बसुन पंख्यांची हवा घेत बसल्याने, कर्मचार्यांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. तर अवास्तव बील आणि वसुली च्या धाकाने वीज ग्राहक मेटाकुटीला आले आहेत.

मोखाड्यात  12  हजार  500  हुन अधिक विज ग्राहक कुटुंब आहेत. तालुक्यात नेहमीच विजेचा लपंडाव सुरू असतो. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने, ग्राहक हैराण झाले आहेत. त्यातच अवास्तव वीजबील येत आहे.

वारंवार तक्रारी करून ही त्याची दखल महावितरणचे अधिकारी घेत नाहीत. अनेक ग्राहकांना येणारे बील हे त्यांना भरण्यापलीकडे येते. त्यामुळे वीज ग्राहकांच्या संतप्त भावना आहेत. नियमीत वीजबील भरणा होत नसल्याने, थकीत वीजबीलाचा आकडा वाढत आहे. 

मार्च महिण्यात थकीत वीजबील वसुलीचा  55  लाखाचा ईष्टांक असल्याचे महावितरणच्या कर्मचार्यांनी सांगितले आहे. मोखाड्यात महावितरणने समाज माध्यमातून, घरोघरी जाऊन, वाहनावर ध्वनिक्षेपकावरुन वीजबील वसुलीची मोहीम राबवली आहे.

तसेच वीजबील न भरल्यास, वीजपुरवठा खंडित करण्याचा ईशारा ही या माध्यमातून दिला आहे. आता महावितरणने आठवडे बाजारात, रणरणत्या उन्हात कर्मचार्यांना हातात ध्वनिक्षेपक घेऊन वीजबील वसुलीसाठी ऊतरवले आहे.

तसेच त्यांच्यावर वीजबील वसुलीसाचा दबाव अधिकार्यांनी टाकल्याचे एका कर्मचार्यांने सांगितले आहे. अधिकारी कार्यालयात पंख्याखाली बसुन हवा खात आहे, आम्ही मात्र, ऊन्हात वसुलीसाठी मरमर मरतो आहे, अशी खदखद वसुलीसाठी फिरत असलेल्या कर्मचार्यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, तालुक्यातील थकीत वीजबील आणि वसुली ची माहिती, ऊप कार्यकारी अभियंता तसेच कनिष्ठ अभियंत्यांकडे मागितली. मात्र, त्यांनी सदरची माहिती दिलेली नाही. त्यामुळे थकीत वीजबील आणि वसुलीच्या धोरणावर शंका ऊपस्थित होत आहे. 

काष्टी- सावर्डे ग्रामपंचायतीसह तालुक्यात अनेक वीज ग्राहकांना, महावितरणने कोर्टाकडुन नोटीसा बजावल्या आहेत. सुरळीत वीजपुरवठा नसतांना, अनेकांना अवास्तव बिले आलेले आहेत. येथील नागरीकांना ते न परवडणारे आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी दमदाटी करून वीजबील वसुली करत आहेत. हा वीजबील ग्राहकांवर अन्याय आहे. 

- हनुमंत पादीर, उपसरपंच, काष्टी- सावर्डे ग्रामपंचायत, मोखाडा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT