मुंबई

उरणमध्ये लवकरच अत्याधुनिक रुग्णालय 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या विमानतळापासून जवळच उरणच्या रस्त्यावर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती सरकारच्या वतीने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. एकूण 100 खाटांच्या क्षमतेचे हे रुग्णालय उभारण्यात येणार असून उरणमधील ग्रामीण रुग्णालयांत ट्रॉमा केअर सेंटरची इमारतही बांधण्यात येणार असल्याचे यावेळी सरकारने न्यायालयात सांगितले आहे. 

उरण सामाजिक संस्थेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी घेण्यात आली. उरण, नवी मुंबई आणि पनवेल येथून राष्ट्रीय महामार्ग थेट जेनपीटीपर्यंत जातो. मालाने भरलेल्या मोठमोठ्या कंटनेर ट्रकची वाहतूक या महामार्गावरून सतत सुरू असते. या महामार्गाला सर्विस रोडही नाही, त्यामुळे बंदराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेली बरीच मोठी वाहने रस्त्याच्या कडेलाच तळ ठोकून असतात, त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 26 हजार 585 वाहतूक गुन्हे घडल्याची माहितीच याचिकाकर्त्यांनी खंडपीठासमोर सादर केली. 

यावर जखमींवर तातडीने उपचार व्हावे यासाठी उरणमध्ये लवकरच, 100 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयात दिली. नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या विमानतळापासून जवळच उरण रस्त्यावर हे रुग्णालय येत्या काही दिवसांत बांधण्यात येणार आहे. यासोबतच उरणमधील सध्याच्या ग्रामीण रुग्णालयांमध्येही ट्रॉमा केअर सेंटरची इमारत बांधण्यात येणार असून यासाठी सिडकोने नुकतीच जमीन दिल्याचेही सरकारच्या वतीने सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT