Covid Care Center
Covid Care Center Sakal
मुंबई

तिसऱ्या लाटेसाठी नेस्को जंबो कोविड केंद्रात 400 बेड्स

भाग्यश्री भुवड
  • लहान मुलांसाठी विशेष पिडीयाट्रिक वॉर्ड

मुंबई: शहरात येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका (Mumbai BMC) सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना (Kids) असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार, नेस्को जंबो कोविड केंद्र (Nesco Jumbo Covid Center) ही सज्ज होत आहे. नेस्को जंबो कोविड केंद्रात लहान मुलांसाठी स्वतंत्र पिडीयाट्रिक वॉर्ड (Pediatric Ward) सुरु करण्यात येणार आहे. या विशेष वाॅर्डमध्ये 400 बेड्सची सुविधा करण्यात आली आहे. तसेच, पिडीयाट्रिक वॉर्डचे सध्या नियोजन करण्यात येत आहे. एका आठवड्यापूर्वी पालिकेच्या इंजिनिअर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेस्कोची पाहणी केली. (Mumbai BMC to install 400 Beds for Kids for third wave of Coronavirus Pediatric wards to be created)

दोन महिन्यांत काम पूर्ण होणार-

'ट्रिपल ए'मध्ये मेडिकल कसन्लटंट्स या पिडीयाट्रिक वॉर्डसाठी नियुक्त करण्यात आले आहे. ते या पिडीयाट्रिक वॉर्डची रचना करतील. त्यानुसार, आता या वाॅर्ड तयार करण्याचे काम सुरू होईल. आणि दोन महिन्यांत या वाॅर्डचे काम होईल.

400 बेड्सच्या वाॅर्डसोबत 20 ते 25 स्वतंत्र पीआयसीयू आणि एनआयसीयू बेड्सची सुविधा असेल. या वाॅर्डमध्ये ऑक्सिजन आणि जनरल बेड्स असतील. लहान मुलांसाठी क्रेश आणि नवजात बालकांसह माता राहाव्या यासाठी ही सुविधा केली जात आहे. 12 ते 15 किंवा 15 वर्षांवरील मुलांसाठी ही सुविधा हे पालिकेकडून सांगण्यात येईल. माता आणि लहान मुलांसाठी छोटे आणि मोठे बेड्स असतील.

बालरोग तज्ज्ञ नेमणार-

लहान मुलांच्या उपचारांसाठी विशेष बालरोग तज्ज्ञांची पालिकेकडून नेमणूक केली जाईल. डाॅक्टर्स आणि नर्सिंग स्टाफची नियुक्ती केली जाईल असे नेस्कोच्या अधिष्ठाता डाॅ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.

दरम्यान, गोरेगाव परिसरातील नेस्को कोविड सेंटर २ जून २०२० पासून सुरू आहे. २ हजार २२१ खाटांच्या या रुग्णालयात वर्षभरात २१ हजार ६३७ रुग्णांवर वैद्यकीय उपचार झाले आहेत. या रुग्णालयात लसीकरण केंद्रदेखील कार्यरत असून आजवर २ लाख ११ हजार १६५ लशीचे डोस देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT