मुंबई

चर्चगेटमधील मेकर भवनला लागलेली आग आटोक्यात

पूजा विचारे

मुंबई- चर्चगेट भागात असलेल्या मेकर भवनमध्ये पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास लागलेली आग लागली होती. या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. 

मेकर भवन मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या कार्यालयात शॉक सर्किटने आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी काही तासातच आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. 

सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलासह एक रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली होती. मेकर भवन इमारतीमध्ये बँका आणि इतर महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये आहेत. आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आली नाही.

mumbai Churchgate Maker Bhavan fire control

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT