corona virus update
corona virus update esakal
मुंबई

मुंबईत कोरोनाचे 285 नवे रुग्ण, तर 4 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत आज 285 नवीन रुग्ण सापडले. तर आज 4 रुग्ण दगावले. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,38,807 इतकी झाली आहे.आज 261 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7,17,452 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत आज 37,052 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 85,80,084 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

 मुंबईत आज दिवसभरात 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 979 इतका झाला आहे. आज मृत झालेल्या रुग्णांपैकी 2 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 1 पुरुष तर 3 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 1 रुग्णाचे वय  40 ते 60 वर्षा दरम्यानचे होते तर 3 रुग्णाचे वय 60 वर्षा वरील होते.

रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1,853 दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.4 % पर्यंत खाली आला आहे.  नव्या रुग्णांपेक्षा आज बरे होणारे रुग्ण अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 % पर्यंत गेले आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 2,946 हजारांवर आला आहे. मुंबईत सक्रिय कंटेंटमेंट झोन ची संख्या संख्या 2 असून सीलबंद इमारतींची संख्या ही 30 आहे. गेल्या 24 तासांत 4,241 अति जोखमीचे संपर्क समोर आले असून 751 जणांना कोविड काळजी केंद्र 1 मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT