मुंबई

मुंबई कोरोना व्हायरस अपडेटः शहरात रूग्ण दुपटीचा दर 86 दिवसांवर

मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईत आज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हजारच्या खाली आला आहे.  आज शहरात 753 रुग्ण सापडले आहे. शहरातील एकूण रुग्णसंख्या 1,29,479 झाली आहे. मुंबईत आज 40 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,170 वर पोहोचला आहे. मुंबईत आज 833 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 80 टक्के इतका आहे. तर रूग्ण दुपटीचा दर हा 86 दिवसांवर गेला आहे.
 
मुंबईत आज नोंद झालेल्या 40 मृत्यूंपैकी 26 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 25 पुरुष तर 15 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 40 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षाखालील होते. 25 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 13 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.
                   
कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 833 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,04,301 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 86 दिवसांवर गेला आहे. तर 16 ऑगस्टपर्यंत एकूण 6,56,690  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 10 ऑगस्ट  ते 16 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.81 इतका आहे. 

मुंबईत 580 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,509 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 5,396 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 3,650 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.9 टक्के

राज्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या दहा हजाराच्या खाली आली आज असून दिवसभरात 8,493 रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 6,04,358 झाली आहे. तर आज दिवसभरात 11,391 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

आज राज्यात दिवसभरात  228 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 20,265 वर पोहोचला आहे. राज्यात आज एकूण 1,55,268 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आज 11,391 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत 4,28,514 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.9 % एवढे झाले आहे. आज राज्यात एकूण 228 मृत्यूंची नोंद झाली. त्यापैकी ठाणे परिमंडळ 74, पुणे 72,नाशिक 25, कोल्हापूर 15,औरंगाबाद  5, लातूर मंडळ 28,अकोला मंडळ 4 ,नागपूर येथील मृत्यूचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.35 % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 32,06,248 नमुन्यांपैकी 6,04,358 ( 18.8 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10,53,659 लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 37,556 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai corona Virus update doubling rate 86 days

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : अस्वलांच्या भयानक हल्ल्यात दोघे गंभीर जखमी

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT