mumbai crime theft case theft in local train two were stripped half-naked by passengers police
mumbai crime theft case theft in local train two were stripped half-naked by passengers police esakal
मुंबई

Mumbai News : लोकलमध्ये चोरी करण्याच्या संशयावरून दोघांना अर्धनग्न करीत प्रवाशांचा चोप

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - लोकल ट्रेनमध्ये चोरी करण्याच्या संशयावरून दोघांना अर्ध नग्न करत प्रवाशांनी चोप दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बदलापूर लोकलमध्ये ही घटना घडली असल्याचे समजत असून याप्रकरणी रेल्वे पोलिसांकडे मात्र कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले. व्हायरल व्हिडीओ द्वारे पोलीस या घटनेची सत्यता पहात आहेत.

व्हायरल झालेला व्हिडीओ मध्ये सदर लोकल ही बदलापूर लोकल असून दिवा ते डोंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान ही घटना घडली असल्याचे लोकलमधील इंडिकेटरवर दिसते आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे, हे अजून समोर आलेले नाही.

सीएसएमटी ते बदलापूर लोकलमध्ये हे संशयित दोन तरुण चोरी करत असल्याचा प्रवाशांना संशय होता. आणि त्यामुळेच प्रवाशांनी या दोघा तरुणांना अर्ध नग्न करत चोप दिला. दरम्यान हा व्हायरल झालेला व्हिडिओ कल्याण रेल्वे पोलिसांकडे देखील आला आहे. रेल्वे पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पुढील तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT