मुंबई

SRA प्रकल्पातील फ्लॅट गैरव्यवहार आरोपावरून किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ

सुनिता महामुनकर


मुंबई  : वरळी येथील झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्पातील सहा सदनिका गैरप्रकारे हडप केल्याचा गंभीर आरोप असलेल्या जनहित याचिकेत दोन आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले. यामुळे पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या कथित गैरप्रकारांबाबत न्यायालयात जनहित याचिका केली आहे. याचिकेवर आज मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खंडपीठाने याचिकेची दखल घेतली आहे.
वरळीतील गोमाता जनता एसआरए सहकारी सोसायटीमधील सदनिका अवैध पध्दतीने पेडणेकर यांनी स्वतःच्या किश कौर्पोरेट प्रा लि. कंपनीमध्ये वर्ग केल्या, असा आरोप केला आहे. या सदनिकामध्ये पेडणेकर लाभार्थी नसतानाही त्यांनी नियम धूडकावून सदनिका बळकावल्या आणि तिथे कार्यालय सुरू केले, असे गंभीर आरोप सोमय्या यांनी केले.

न्यायालयाने आज याप्रकरणात एसआरए प्राधिकरणाला आरोपांबाबत खुलासा करण्याचे निर्देश दिले. तसेच अन्य प्रतिवादींनाही बाजू मांडण्याचे निर्देश दिले. 

पेडणेकर यांनी गैरप्रकारे पदाचा वापर केला, त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी, त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करावी, त्यांचे नगरसेवक पद अपात्र करावे इ. मागण्या करण्यात आल्या आहेत.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)

Mumbai High Court directed Kishori Pednekar six flats SRA issue marathi latest live update

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT