ATS
ATS esakal
मुंबई

Telephone Exchange : नागपाड्यात बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश; एटीएसची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

परदेशातून येणारे फोन विनापरवानगी थेट लोकल फोनसेवेवर वळवून मोबाइल कंपन्या आणि सरकारचे आर्थिक नुकसान करणाऱ्या बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजचा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने एटीएसने छडा लावला आहे.

मुंबई - परदेशातून येणारे फोन विनापरवानगी थेट लोकल फोनसेवेवर वळवून मोबाइल कंपन्या आणि सरकारचे आर्थिक नुकसान करणाऱ्या बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजचा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने एटीएसने छडा लावला आहे. एटीएस’च्या पथकाने नागपाडा परिसरात छापा टाकून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याने हे बेकायदा एक्स्चेंज चालविण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे पन्नासपेक्षा अधिक सिमकार्ड घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या फोन क्रमांकाची कुठेच नोंद होत नसल्याने त्याचा समाजविघातक कृत्यांसाठी वापर होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.

नागपाडा परिसरात बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज चालविले जात असल्याची माहिती ‘एटीएस’च्या पथकाला मिळाली. या एक्स्चेंजबाबत माहिती काढत असताना ते चालविणारा तरुण आग्रीपाडा येथील एक झेरॉक्स सेंटरमधून रिचार्ज करीत असल्याचे समजले. पोलिसांनी झेरॉक्स सेंटर चालविणाऱ्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोहम्मद इद्रिस अन्सारी या तरुणाबाबत माहिती मिळाली. हा तरुण स्वतःच्या मोबाइल क्रमांकाबरोबर जवळपास 50 जणांचे मोबाइल रिचार्ज करीत असल्याचे त्याने सांगितले.मोबाइल रिचार्ज करीत असल्याचे त्याने सांगितले. यावरून एटीएसच्या अधिकाऱ्यांना बेकायदा एक्स्चेंज चालवले जात असल्याची खात्री पटली. या माहितीच्या आधारे पथकाने टेलिफोन प्राधिकरण, सायबरतज्ज्ञ यांना सोबत घेऊन मदनपुरा परिसरातील अजमल हाइट्स या इमारतीच्या 20व्या मजल्यावर छापा टाकला.

सिमबॉक्स, राऊटर्स, तसेच इतर वेगवेगळ्या माध्यमांतून अन्सारी याने बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज थाटल्याचे निदर्शनास आले. इद्रिस अन्सारी हा इंटरनेट, तसेच वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून परदेशातून येणारे फोन मोबाइल कंपन्यांच्या सर्व्हरवर जाऊ न देता थेट वळवत होता. यामुळे मोबाइल कंपन्यांचे आर्थिक नुकसान होत होते. त्याचबरोबर अशा फोनचा कोणताच लेखाजोखा कंपन्यांकडे ठेवणे अशक्य होते.अन्सारी याच्या विरोधात नागपाडा पोलिस ठाण्यात फसवणूक, तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अन्सारी याच्या बेकायदा एक्स्चेंजवर आलेल्या फोनची ‘एटीएस’कडून झाडाझडती घेतली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT