मुंबई

मालाड दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना ७ लाखांची मदत जाहीर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai heavy rainfall) मालाडमध्ये इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली. बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाड पश्चिमेला न्यू कलेक्टर कंपाऊड परिसरात एक रहिवाशी इमारत कोसळली. (residential structure collapsed) या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले. मृतांमध्ये ८ मुलांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (Mumbai Malad Building Collapse State Govt gives 5 Lakh rupees Modi Govt announced ex gratia of 2 lakh)

"मालाड येथे इमारत कोसळून दुर्देवाने मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना शासनातर्फे प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली", अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली. तर, "मुंबईत मालाड पश्चिम इथे इमारत दुर्घटनेतील जीवीतहानीमुळे तीव्र दु:ख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो", असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आले. केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार असल्याचीही घोषणा केली.

मृतांची नावे-

1. साहिल सरफराज सय्यद (९ वर्षे)

2. अरीफा शेख (९ वर्षे)

3. शफीक मो. सलीम सिद्दीकी (४५ वर्षे)

4. तौसिफ शफीक सिद्दीकी (१५ वर्ष)

5. अल्फिसा शफीक सिद्दीकी (दीड वर्षे)

6. अलिशा शफीक सिद्दीकी (१० वर्षे)

7. आफिना शफिक सिद्दीकी (६ वर्षे)

8. इशरत बानो शफीक सिद्दीकी (४० वर्ष)

9. रहिसा बानो रफिक सिद्दीकी (४० वर्ष)

10. तहेस शफिक सिद्दीकी (१२ वर्षे)

11. जॉन इरांना (१३ वर्षे)

जखमींची नावे-

(१) मरीकुमारी हिरांगणा ( महिला ३० गंभीर)

(२) धनलक्ष्मी ( महिला / ५६)

(३) सलीम शेख (पुरुष / ४९)

(४) रिझवाना सय्यद (महिला /३५)

(५) सुर्यमणी यादव ( पुरुष / ३९)

(६) करीम खान ( पुरुष /३०)

(७) गुलजार अहमद अन्सारी ( पुरुष / २६)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT