mumbai mankhurd fire news
mumbai mankhurd fire news 
मुंबई

मुंबई - मानखुर्दमधील मंडळ परिसरात भीषण आग, जिवीतहानी नाही

सकाळ डिजिटल टीम

मंडळ परिसरात भीषण आग लागली असून याठिकाणी अग्निशामक दलाचं पथक दाखल झालं आहे.

मुंबई - कंपनीला आग लागण्याच्या घटना वारंवार ऐकायला मिळत असतात. दरम्यान, आता अशीच एक बातमी मुंबईतील मानखुर्द येथून समोर येत आहेत. येथील मंडळ परिसरात भीषण आग लागली असून याठिकाणी अग्निशामक दलाचं पथक दाखल झालं आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसून गोडावुनचे नुकसान झाले आहे. तसेच या परिसरात वारंवार आग लागतात तरीही प्रशासन ठोस पावलं का उचलत नाही असा सवाल नागरिक करत आहेत. (mumbai mankhurd fire news)

मिळालेली माहिती अशी की, मागील चार ते पाच वर्षात या परिसरात सात ते आठ वेळा भीषण आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मानखुर्दच्या या मंडळ परिसरामध्ये विविध प्रकारचे गोडावून आहेत. त्यामध्ये काळ्या तेलाचे, साबण बनवणारे तसेच फर्निचर असणारे गोडावून आहेत. अशाप्रकारे ज्वलनशील पदार्थांची ही गोडावून असल्याने येथे आग लागल्याच्या घटना घडत असतात. या घटनेत आगीचे लोट अगदी चेंबुरपासून दिसत आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीचे भीषण स्वरूप पाहून नुकसान अधिक प्रमाणात झाले असल्याचे समोर येत आहे. अग्निशामक दलाच्या सुमारे आठ ते नऊ बंब येथे दाखल झाले आहेत. तसेच पोलिस आणि अधिकारी घटनास्थली दाखल झाले आहेत. मात्र या ठिकाणी कोणतीही ठोस कारवाई होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT