mumbai Milk
mumbai Milk esakal
मुंबई

Mumbai Milk : दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी मोठी मजल आवश्यक; गोदरेज जर्सीच्या भूपेंद्र सुरी यांचे मत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतातील गाई-म्हशींचे दूध उत्पादन वाढावे यासाठी सर्वच दृष्टीने प्रयत्न आवश्यक असून त्यात आपल्याला फार मोठी मजल मारायची आहे, असे मत गोदरेज जर्सी चे व्यवस्थापकीय संचालक भूपेंद्र सुरी यांनी सकाळ कडे व्यक्त केले.

पाश्चिमात्य देशांमध्ये अत्यंत व्यावसायिक आणि आधुनिक पद्धतीचे चार-पाच हजार गुरांचे गोठे असल्याने त्यांची उत्पादकताही मोठी असते. आपणही त्याच्या जवळपास गेलो तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना तसेच दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपन्यांना होईल. त्यासाठी गोदरेज जर्सी तर्फेही दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुरांची काळजी घेणे,

त्यांची उत्पादकता वाढवणे, त्यासाठी चांगला पशु आहार वापरणे आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. आपणही एकंदर सर्वच बाबतीत काळजी घेतली तर आपलेही उत्पादन वाढू शकते, अशीही खात्री त्यांनी व्यक्त केली.

दूध उत्पादन वाढवण्यासाठी सीएसआर योजनेतूनही शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्यासाठी पशुधन शिबिरे आयोजित करणे, पशुवैद्यकांची नियुक्ती करून शेतकऱ्यांना सहाय्य करणे आदी उपाय केले जातात असेही ते म्हणाले. गोदरेजच्याच मॅक्सिमिल्क तर्फे नाशिकला आधुनिक गोठ्यात गुरांचे दुधाचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात यासाठी शेतकऱ्यांना खूप शिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला सर्वच पातळीवर मोठी मजल मारावी लागेल असेही सुरी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

SCROLL FOR NEXT