मुंबई

साडेपाच हजार कोटींची ठाणे शहरात गुंतवणूक

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यातील 45 टक्के लोकसंख्या शहरांत राहते. त्यामुळे शहरे स्मार्ट होण्याची गरज आहे. हाच दृष्टिकोन ठेवून ठाणे शहरात पाच हजार 493 कोटींची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती ठाण्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुनील चव्हाण यांनी मंगळवारी दिली.

"स्मार्ट सिटी आणि सिटी कनेक्‍ट' या परिसंवादात ते बोलत होते.
स्मार्ट शहरांतील नागरिकांच्या गरजा काय आहेत, ही माहिती घेण्याचे सर्वेक्षण आम्ही पूर्ण केले आहे. बहुतांश नागरिकांनी ठाणे रेल्वेस्थानकाच्या विकासाची मागणी केली. महिलांची सुरक्षा, 24 तास पाणीपुरवठा यांसारख्या गोष्टींचीही मागणी नागरिकांनी केली आहे. ठाणे महापालिकेनेही शहरासाठी काही विकास प्रकल्प राबवले आहेत. रस्ते विकास, पदपथ, सायकल ट्रॅकचा प्रकल्प यांसारख्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. ठाणे व मुलुंड या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान 15 एकर जमिनीवर "न्यू ठाणे' स्थानक उभारण्यात येणार आहे. यात सोलार रूफ टॉप, स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट स्कीम यांसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. महिलांसाठी विश्रांतिगृह व हिरकणी कक्ष यांसारख्या सुविधाही येथे असतील.

स्मार्ट शहरांकडे "ग्रीन सिटी' म्हणूनही पाहण्याची गरज आहे. पाणी, घनकचरा व विजेचे व्यवस्थापन, तसेच शहरे आणि नागरिकांचा विकास या संकल्पनांचाही विचार होण्याची गरज आहे, असे कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे (सीआयआय) पॉलिसी आणि ऍडव्होकसीचे अध्यक्ष व्ही. नरेश यांनी व्यक्त केले आहे. स्मार्ट शहरांमधील मुख्य आव्हान कुशल मनुष्यबळाचे आहे. त्यामुळेच शहरांसाठी एकीकडे गुंतवणूक, विकासाचे मॉडेल ठरत असताना कुशल मनुष्यबळाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत सीआयआयचे स्मार्ट सिटी विभागाचे अध्यक्ष सुनील खन्ना यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार: उद्धव ठाकरे

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Crime News: भर कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने जमिनीवर आपटलं; न्यायमूर्तीही झाले सुन्न

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : राहुल अन् प्रियांका गांधींनी देशाची माफी मागावी; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक

SCROLL FOR NEXT