मुंबई

बेस्ट कामगारांना देणार साडेपाच हजारांचा ऍडव्हान्स 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - खास दिवाळीसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार रुपये सानुग्रह अनुदानापोटी ऍडव्हान्स म्हणून देण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला, अशी माहिती महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. सानुग्रह अनुदानापोटी 25 कोटी महापालिका बेस्टला देणार आहे. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने बेस्ट कर्मचाऱ्यांना ही ऍडव्हान्स रक्कम देण्याचा निर्णय झाला आहे. त्यांनी पालिका आयुक्त, बेस्टचे महाव्यवस्थापक आणि बेस्ट समिती अध्यक्षांशी याबाबत चर्चा केली. योग्य समन्वयातून हा निर्णय घेतला असल्याचे महापौरांनी सांगितले. पालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीला सर्व गटनेते उपस्थित होते. बेस्टची आर्थिक स्थिती बिकट आहे. कर्मचारी संघटना दिवाळीसाठी बोनस मिळावा यासाठी आग्रही आहे. आर्थिक ओढग्रस्तीमुळे बेस्ट बोनस देण्याच्या स्थितीत नाही. कायदेशीर अडचणींमुळे पालिकेलाही बेस्टला थेट मदत करण्यात अडचणी येत आहेत. हे लक्षात घेऊन पालिका बोनसऐवजी तेवढीच रक्कम आगाऊ स्वरूपात कर्ज (ऍडव्हान्स) म्हणून, सुधारणा करण्याच्या अटीवर बेस्टला देण्यास तयार आहे. बेस्ट ही रक्कम कर्मचाऱ्यांना आगाऊ रक्कम म्हणून देईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

या सुधारणांची प्रक्रिया सुरू झाल्यास दिली जाणारी आगाऊ रक्कम बोनस म्हणून गणली जाईल. सुधारणांची प्रक्रिया सुरू न झाल्यास सध्या दिवाळीसाठी दिलेली रक्कम आगाऊ समजून प्रचलित नियमाप्रमाणे ती नंतर वसूल केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT