crime
crime 
मुंबई

मुंबई: महिलेवर कार्यालयामध्ये घुसून चाकूने हल्ला

अक्षय गायकवाड

विक्रोळी : चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलींवरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच विक्रोळीत सत्तावीस वर्षीय विवाहित महिलेच्या कार्यालयामध्ये घुसून तरुणाने चाकूने हल्ला केल्याची घटना शनिवारी घडलीे. ती महिला या कार्यालयात कामाला आहे.

सावीर हसन मोहम्मद खान (23) असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून तो वाकोला येथे राहतो. आरोपी आणि या महिलेची जुन्या कार्यालयात ओळख झाली होती.एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असून या मुलीच्या अश्लील क्लिप काढून सावीर तिला हा ब्लॅक मेल करीत वारंवार बलात्कार करीत होता. शनिवारी दुपारी साबीर हा या महिलेच्या ऑफिस मध्ये गेला तिथे त्याला तिने ऑफिसच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला.यात महिला गंभीर जखमी झाली असून चेहऱ्यावर हातावर तेहत्तीस टाके पडले आहेत.

महिलेचा जबाब नोंदविण्याचे प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पूर्व नगरात दोन दिवसात महिलेवरील हल्ल्याची दुसरी घटना घडली असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT