मुंबई

गोरेगावात म्हाडाची परवडणारी घरे!

सकाळवृत्तसेवा

मुंबई - म्हाडातर्फे गोरेगाव येथे लिंकरोडवर तीन वर्षांत परवडणारी पाच हजार घरे उभारण्यात येणार आहेत. 18 एकरवर होणारा हा म्हाडाचा मुंबईतील सर्वांत मोठा प्रकल्प असेल. त्याच्या निविदा आठवडाभरात काढल्या जाणार आहेत.

बांगूर नगर येथे दोन भूखंडांवर हा प्रकल्प होईल. त्यातील "अ' भूखंडावर अंदाजे 2,950 सदनिका उभारण्यात येतील. पैकी 1,665 सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी, 555 सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी, 417 सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी, 313 सदनिका उच्च उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत. "ब' भूखंडावर अंदाजे 2,109 सदनिका असतील. त्यापैकी 1,190 सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी, 397 सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी, 298 सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी, 224 सदनिका उच्च उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत. मध्यंतरी हा भूखंड एका विकसकाला विकला गेला. त्यामुळे शहर दिवाणी न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय असा हा खटला 25 वर्षे चालला. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या महिलेचे व बिल्डरच्या जमिनीवरील हक्क सांगण्याकरिता केलेले सर्व दावे फेटाळून लावले. याशिवाय सरकारी जमीन हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांना एक कोटीचा दंडही ठोठावला. अत्यंत मोक्‍याच्या ठिकाणी असलेल्या या भूखंडावरील अतिक्रमण रोखण्यासाठीही म्हाडाच्या अभियंत्यांनी अनेकवेळा प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT