मुंबई

दिल्लीच्या प्रदूषणाची मुंबईने गाठली पातळी 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - धुरक्‍याच्या प्रभावाने मुंबईसह नवी मुंबईची हवा सलग दुसऱ्या दिवशी रविवारी खराब दिसून आली. आज धुरक्‍याच्या प्रभावामुळे मुंबतील हवेचा दर्जा शनिवारपेक्षाही जास्त खालावला होता. उद्या (सोमवारी) देखील मुंबई व नजीकच्या भागात धुरक्‍याचा प्रभाव कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. 

नवी मुंबईतील हवेचा दर्जा आज अत्यंत वाईट या वर्गवारीत होता. शनिवारी नवी मुंबईतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण तीनशे एकोणपन्नासवर होते. नवी मुंबईत खालावलेल्या हवेच्या दर्जाने थेट दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाची मर्यादा गाठली. नवी दिल्लीतील धीरपूर, पुसा, नोएडा, दिल्ली विमानतळ या स्थानकांपेक्षाही नवी मुंबईतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जास्त दिसून आले. वाढलेली आर्द्रता आणि हवेचा वेग मंदावल्याने मुंबईत धूर आणि धुके यांच्या मिश्रणातून हवेचा दर्जा ढासळलेला आहे. 

ओखी चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर सर्दी व खोकल्याचे रुग्ण मुंबईभर वाढले असल्याची माहिती डॉक्‍टरांकडून मिळत आहे. आता धुरक्‍याच्या प्रभावामुळे दमेकरी रुग्णही आता दवाखान्यांबाहेर रांगा लावतील, अशी भीती कान, नाक व घसातज्ज्ञांनी व्यक्त केली. "मुंबई सफर' या प्रकल्पांतर्गत मुंबईतील विविध स्थानकांच्या हवेच्या प्रदूषणाची माहिती दिली जाते. गेल्या दोन दिवसांपासू मुंबई, नवी मुंबईतील स्थानकांतील घसरत्या हवेच्या दर्जाबद्दल "मुंबई सफर'च्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT