मुंबई

हॉटेलमधील धूम्रपान थांबविण्याचे आदेश

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महापालिका, नगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना आता आपल्या कार्यक्षेत्रातील हॉटेलमध्ये ध्रूम्रपान रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ज्या हॉटेलमध्ये बेकायदा धूम्रपान होत असेल तर त्यांचे परवाने रद्द केले जाऊ शकतात. तशा आशयाचे आदेश जारी करण्याबाबत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी या खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना लेखी सूचना केली आहे.

तंबाखू, सिगारेट, गुटखा असे कोणतेही धूम्रपान करण्यासाठी हॉटेलमध्ये "स्पेशल झोन' तयार करावे लागतात. त्यासाठी स्पेशल झोनची महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. पण परवानगी न घेताच धूम्रपान केल्याचा प्रकार मुंबईतील पाच हॉटेलमध्ये आढळून आले. त्यानंतर महापालिकेने या हॉटेलवर कारवाई केली. त्याबाबतचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत राज्यमंत्री पाटील यांनी आदेश जारी केले आहेत. मुंबई महापालिकेने हॉटेलवर केलेल्या कारवाईच्या धर्तीवर राज्यातील महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अंमलबजावणी करावी, अशी सूचना पाटील यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT