मुंबई

बाळासाहेब ठाकरेंच्या प्रस्तावित स्मारकासाठी तीन भुमिगत इमारती बांधणार, कसं असेल बाळासाहेबांचे स्मारक

समीर सुर्वे

मुंबई, ता.12: शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित स्मारकासाठी तीन भुमिगत इमारती बांधण्यात येणार आहे. तर, सध्या अस्तीत्वात असलेल्या महापौर बंगल्यात प्रत्यक्ष स्मारक तयार करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण विभागाकडे सागरी किनारा संरक्षण कायद्या अंतर्गत परवानगीसाठी पाठविण्यात आला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित स्मारकाला 2018 मध्ये सीआरझेड कायद्याअंतर्गत महाराष्ट्र सागरी किनारा संरक्षण प्राधिकरणाने परवानगी दिली होती. मात्र, नंतर स्मारकाच्या आराखड्यात बदल करण्यात आल्याने नव्याने मंजूरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार महापाैर बंगल्याच्या मुळ इमारतीत तळमजला आणि पहिला मजला संग्रहालयासाठी वापरण्यात येणार आहे.

त्या व्यतिरीक्त तीन इमारतींचे बांधकाम होणार आहे. मात्र, या तीन्ही इमारती पूर्णतः भुमिगत आणि तळमजल्या पुरते मर्यादित राहाणार आहे. महाराष्ट्र सागरी किनारा संरक्षण प्राधिकरणाने या सुधारीत आराखड्याला महिन्या भरापुर्वी सशर्त परवानगी दिली आहे. आता हा प्रस्ताव केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे.

असे असेल स्मारक

  1. विद्यमान महापौर बंगल्याच्या ढाच्यात कोणताही बदल न करता तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर बाळासाहेबांचे स्मारक असेल.यात प्रामुख्याने बाळासाहेबांच्या वापरातील काही वस्तू, त्यांची भाषणे, व्यंगचित्र त्यांचा जिवनपट उलगडून सांगतील अशा वस्तू असतील.
  2. पहिल्या भुयारी इमारतीत ग्रंथालय, आक्राईव्हज वस्तुसंग्रहालय शॉप, आर्ट गॅलरी तसेच मेटेन्ससची खोली तर,जमिनीवर कारंजा असेल. तर,पोटमाळाही असेल.
  3. दुसऱ्या इमारतीत कॅफे कलाकारांची खोली, बहुउपयोगी खोली, कर्मचारी दालन आणि निवासी संकुल
  4. तीसरी भुयारी इमारत ही दोन मजल्याची असेल, वरच्या बेसमेंटमध्ये असेंमब्ली हॉल, पॅन्ट्री तर खालच्या बेसमेंटमध्ये वाहानतळ असेल. तळ मजल्यावर मिटींग रुम, तिकीट कांऊटर असेल.

राज्य सरकारच्या प्राधिकरणाने नऊ अटींसह ही परवानगी दिली आहे. यात प्रामुख्यने सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे, ऑर्गनिक वेस्ट कनव्हर्टर वापरणे आणि विजेची बचत होईल अशी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर चटई क्षेत्र निर्देशांकाचे उल्लंघन न करता संपुर्ण बांधकाम करण्याची अट ठेवण्यात आली आहे. या तीन इमारतींच्या बांधकामासाठी 11 हजार 963 चाैरस मिटरचे बांधकाम करण्यात येणार आहे.

mumbai news three underground buildings will be build for the balasaheb thackeray memorial

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT