Crime News
Crime News esakal
मुंबई

Crime News : सीमा शुल्क विभागाची अधिकारी बनून व्यापाऱ्याची फसवणूक; महिला अटकेत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सीमा शुल्क विभागाचे अधिकारी बनून व्यापाऱ्याची लूट आणि फसवणूक केल्या प्रकरणी सहार पोलिसांनी एका महिलेला शनिवारी अटक केली आहे. या प्रकरणात सहार पोलीस अटक आरोपी महिलेच्या दोन पुरुष साथीदारांचा शोध घेत आहेत. सीमा शुल्क विभागाचे अधिकारी बनून मुंबई विमानतळावर कर्नाटकातील एका व्यावसायिकाची 26 लाख रुपयांची फसवणूक केली होती.

या प्रकरणात तक्रारदार सज्जाद हुसैन हा मौल्यवान खड्याचा व्यापारी आहे. 30 मे रोजी रात्री हुसैन त्याच्या दोन मित्रांना भेटण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेला होता.

हुसेन त्याच्या दोन मित्रांची वाट पाहत असताना रात्री 10.30 च्या सुमारास एक महिला आणि दोन पुरुष त्याच्याजवळ आले आणि त्यांनी स्वत:ची सीमाशुल्क अधिकारी असल्याची ओळख पटवली दुबईला जाणाऱ्या आपल्या दोन मित्रांना भेटण्यासाठी सज्जाद हुसेन हा व्यापारी मुंबई विमानतळावर आला होता. त्याच्या बॅगेत 25 हजार अमेरिकन डॉलर्स आणि 25 हजार दिरहम विदेशी चलन होते.

याची भारतीय चलनात 26 लाख एवढी किंमत होते. त्यानंतर स्कॅनर मशीनमध्ये बॅग तपासण्याच्या बहाण्याने त्याची बॅग मागितली आणि आरोपी बॅग घेऊन फरार झाले. यानंतर पिडीत व्यक्तीने सहार पोलिसात गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. या प्रकरणी तिघांपैकी एक आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT