मुंबई

नवी मुंबईत अपघातकोंडी

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - शीव-पनवेल महामार्गावरील उरण-फाट्याजवळ बुधवारी पहाटे ५ च्या सुमारास पुण्याकडे जाणारा एलपीजी गॅसचा टॅंकर कलंडल्याने महामार्ग व ठाणे-बेलापूर रस्त्यावरची पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. हा टॅंकर हटवण्यास अग्निशमन दल व पोलिसांना १२ तासांचा वेळ लागल्याने ऐरोलीपासून बेलापूरपर्यंतची अंतर्गत वाहतूक कोलमडली होती. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले.

नवी मुंबईतून शीव-पनवेल व ठाणे-बेलापूर मार्ग जात असल्याने या मार्गांवर अपघात झाल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी नवी मुंबईकरांसाठी नवीन नाही; मात्र बुधवारी पहाटे झालेल्या अपघातामुळे येथील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. इंडेन कंपनीचा कलंडलेला गॅस टॅंकर रिकामा करण्यासाठी दुसरा टॅंकर येईपर्यंत अग्निशमन दल व पोलिसांना वाट पाहावी लागली. नेरूळजवळील उरण फाटा येथे हा अपघात झाल्याने परिसरात एलपीजीचा गंध पसरला होता. त्यामुळे अनुचित घटना घडू नये याकरिता वाहतूक पोलिसांनी शीव-पनवेल महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक उरण फाट्याजवळील उड्डाणपुलावर बंद करून पुलाखालून पाम बीच मार्गाने पुणे व मुंबईच्या दिशेने वळवली होती.

 महामार्गावरील वाहतूक अचानक पाम बीच मार्गावर वळवल्यामुळे त्याचा ताण शहरातील अंतर्गत रस्त्यांवर आला. या रस्त्यांवर रोज धावणाऱ्या शाळेच्या बस, दुधाचे टेम्पो, रिक्षा, दुचाकी आणि खासगी वाहने यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर कोंडी झाली. उरण फाट्यापासून पाम बीच रोडवरून थेट उलवेपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

शाळा-कार्यालयांना दांडी
शीव-पनवेल महामार्गावरील अपघाताचा परिणाम सकाळी ७ पासून जाणवायला सुरुवात झाली. महामार्गावरील दोन्ही दिशांकडील वाहतूक अंतर्गत रस्त्यांवर वळवल्यामुळे वाहतूक खोळंब्यात शाळेला जाणाऱ्या व एनएमएमटीसह बेस्टच्या बस बराच वेळ रखडल्या. तब्बल अर्धा तास एकाच जागेवर वाहने उभी असल्याने अनेकांनी शाळा, कॉलेज व कार्यालयांत जाण्याऐवजी घरी जाणे पसंत केले. त्यामुळे त्यांची आज दांडी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : जळगाव-पाचोरा रोडवर भीषण अपघातात; ३ शाळकरी मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT