central railway sakal media
मुंबई

मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेत दक्षता जनजागृती आठवडा सुरू

कुलदीप घायवट

मुंबई : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल (sardar vallabhbhai patel) यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर यादरम्यान पश्चिम रेल्वेवर (western railway) दक्षता जनजागृती आठवडा साजरा करण्यात येत आहे. तर, मध्य रेल्वेवर (central railway) 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान दक्षता जनजागृती आठवडा साजरा केला जाणार आहे. मंगळवारी, (ता.26) रोजी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयात पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी इमानदारीने काम करणार, भ्रष्ट विचारांचा, कामांचा भाग बनणार नाही, अशी शपथ घेतली. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात (CSMT) मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी (Anil kumar lahoti) यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'एकात्मता आणि नागरिकांची प्रतिज्ञा' दिली.  

मध्य रेल्वेच्या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालायाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.पी.धर्माधिकारी म्हणाले की, दक्षता विभाग हा कोणत्याही संस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. जो सर्व विभागांचे कार्यक्षमतेने कार्य सुनिश्चित करतो. रेल्वे नैतिक जबाबदारीतही अग्रेसर आहे. दक्षता विभागाने प्रकरणे वेळेत निकाली काढण्याचे पालन करावे, वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यात अयशस्वी झाल्यास सामूहिक जबाबदारी निश्चित करण्याची पद्धत अवलंबावी. प्रकरणांचा तपास पूर्ण करण्यासाठी वेळ निश्चित करणे, अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा आणि प्रदीर्घ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी एक समिती नेमण्याची आली पाहिजे. निरपराधांच्या छळाला आळा घालायला पाहिजे, असे धर्माधिकारी म्हणाले.

पश्चिम रेल्वेच्या कार्यक्रमात महाव्यवस्थापक आलोक कंसल म्हणाले की, प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवस किंवा एकच आठवडा इमानदारीने काम न करता संपूर्ण वर्षेभर इमानदारीने काम केले पाहिजे. प्रत्येक विभागात डिजिटलाझेशनचा वापर वाढविण्यात यावा. जेणेकरून मानवी हस्तक्षेपाचा वापर कमी होईल. प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याने आपल्या जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे आणि कर्तव्याचे पालन केले पाहिजे. देशाच्या प्रगतीच्या आड भ्रष्टाचार येत असल्याने भ्रष्टाचाराला समूळ नष्ट केले पाहिजे, असे कंसल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT