Mumbai Dam Sakal
मुंबई

Mumbai : मुंबईला जलसाठ्याचा दिलासा, धरणांमध्ये ६८ टक्के पाणी; त्यामुळे पालिका ऑगस्टमध्ये...

सध्या राज्यभरात पावसाचा जोर वाढला असून कोकण, विदर्भ आणि इतर काही भागांत अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले

सकाळ वृत्तसेवा

Mumbai - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी तुळशी, विहार, तानसानंतर मोडकसागर धरणही गुरुवारी (ता. २७) रात्रीपासून भरून वाहू लागले. त्यामुळे सातही धरणांमध्ये सरासरी ६८.६ टक्के पाणीसाठा झाला असून तो एप्रिल २०२४ पर्यंत पुरेल. त्यामुळे पालिका येत्या ऑगस्टमध्ये पाणीकपात रद्द करण्याची शक्यता आहे.

मान्सून लांबल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांनी जून महिन्यात तळ गाठला होता. परिणामी पालिकेला १० टक्के पाणीकपात करावी लागली. सध्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू आहे.

सात धरणांची पाणी साठवण क्षमता सुमारे १,४४,७३६.३ कोटी लिटर इतकी आहे. धरणांतील पाणीसाठ्याची उपलब्धता लक्षात घेत १ जुलैपासून मुंबईत लागू असलेली १० टक्के पाणी कपात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

पालघर, रायगडमधील धरणेही भरून वाहू लागली

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारी बहुतांश सर्वच धरणे मुसळधार पावसाने भरून वाहू लागली आहेत. त्यात नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण ९५ टक्के; तर मुरबाडमधील बारवी धरण ९३ टक्के भरले आहे. धरणे भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार असून, काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत : मुख्यमंत्री

सध्या राज्यभरात पावसाचा जोर वाढला असून कोकण, विदर्भ आणि इतर काही भागांत अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीसाठी प्रतिकुटुंब १० हजार रुपये वाढीव मदत देण्याची आणि दुकानदार, टपरीधारक यांनाही आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.

ही वाढीव मदत जून ते ऑक्टोबर २०२३ या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येईल. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अट शिथिल करून ही रक्कम आता दुप्पट करण्यात येत आहे.

राज्यातील धरणांत ५५ टक्के साठा

सोलापूर - पावसाळा सुरू होऊनही ओढ दिलेल्या पावसाने ८ जुलैनंतर राज्यभर हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील २६ धरणांपैकी २० धरणांचा पाणीसाठा आता ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणीटंचाई आणि पेरणी व दुबार पेरणीची चिंता दूर झाली आहे. दरम्यान राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

चंद्रपूर जलमय

विदर्भात पावसाचा जोर कायम असून मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे चंद्रपूर शहरातील अनेक रस्ते आणि वस्त्या पाण्याखाली गेल्या आहेत. येथील इरई धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा नदीही काठ सोडून वाहत असल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करावे लागले आहेत.

सात धरणांतील पाणीसाठा

अप्पर वैतरणा - ९७,१४१

मोडक सागर - १,२८,९२५

तानसा - १,४४,४७५

मध्य वैतरणा - १,५४,२४९

भातसा - ४,२४,५९६

विहार - २७,६९८

तुळशी - ८,०४६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT