Mumbai News
Mumbai News sakal
मुंबई

Mumbai Traffic: लवकरच तयार होणार मढ-वर्सोवा उड्डाणपूल; १० मिनिटांत पार होणार २२ किमी अंतर!

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: अंधेरी पश्चिम येथील मढ-वर्सोवा प्रकल्पाला सीआरझेडची परवानगी मिळाल्याने या पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे. मढ बेट-वर्सोवादरम्यान २२ किमीचे अंतर स्वामी विवेकानंद मार्गाने कापण्यासाठी ४५ ते ९० मिनिटे इतका वेळ लागतो.

मात्र पूल सेवेत आल्यावर अवघ्या १० मिनिटांत हे अंतर येणार आहे. या पुलाच्या कामासाठी मुंबई महापालिकेकडून ७०० कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली. अंधेरीत येथील गोखले पूल कोसळून दोन जणांचा तर १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील 'हिमालय' पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या दुर्घटनानंतर महापालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट केले.

ऑडिट अहवालातील शिफारसीनुसार आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने, तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबईतील उड्डाणपुलांचे जाळे वाढवले जात आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात नवीन पुलांची उभारणी करण्यात येत आहे. या पुलासह पी/उत्तर मालाडमधील धारिवली गाव येथील मार्वे रोडवरील पूल आणि के/पश्चिम आणि पी-दक्षिण गोरेगावच्या सीमेवर वाहनांसाठी भगत सिंग नगर गोरेगाव खाडीजवळ देखील पूल बांधण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले.

मढ ते वर्सोवा थेट सार्वजनिक वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणजे फेरीसेवा आहे. मात्र ही सेवा वर्षातून चार महिने बंद असते. त्यामुळे मढ किंवा वर्सोवा येथे जाण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग किंवा स्वामी विवेकानंद मार्ग असे दोन अन्य वाहतुकीचे पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. काही वर्षांपासून नवीन पुलाची मागणी केली जात होती.

मालाड पश्चिमेकडील मढ परिसर आणि अंधेरीतील वर्सोवा हा भाग सागरी किनारपट्टीने वेढलेला आहे. त्यामुळे या भागांत प्रवासासाठी सागरी बोटीचा वापर होतो. ही जलवाहतूक अधिक जलद करण्यासाठी मढ ते वर्सोवा या जलवाहतूक पुलाचा पर्याय काढण्यात आला आहे. या पुलांसाठी महत्त्वपूर्ण असणारी सीआरझेड परवानगी मिळाल्यामुळे हे पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्थानिकांना दिलासा

मुंबईत बांधण्यात येणारे नवीन पूल वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व वेगवान प्रवासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. मढ - वर्सोवा या नव्या पुलामुळे दोन्ही भागांतील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, मच्छीमार बांधव, व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT