मुंबई

निकालापुर्वीच विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) एम ए पार्ट वन पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. यातच आयडॉलने या अभ्यासक्रमाच्या निकालापुर्वीच एम ए पार्ट दोनची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. 

विद्यापीठाच्या एम ए पार्ट वन अभ्यासक्रमाची परीक्षा जून महिन्यात झाली. या परीक्षेचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही. यातच आयडॉलने विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये एम ए पार्ट वन आणि दोनच्या प्रवेश प्रक्रियेचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे अद्याप निकाल जाहीर झाले नसल्याने पुढील वर्षाचे अर्ज कसे भरायचे, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडला आहे. आयडॉलच्या कारभारावर स्टुटंट लॉ काउन्सिलने टिका केली आहे. कुलगुरूंचे याकडे लक्ष नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप, संघटनेचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केला आहे.दरवर्षी आयडॉलमार्फत प्रथम आणि द्वित्तीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया एकत्रिक राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेच्या स्वतंत्र तारखा असतात. पार्ट वनचा निकाल जाहीर झाला नसला तरी या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र तारीख देण्यात येते, असे आयडॉलचे जनसंपर्क अधिकारी विनोद माळाळे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT