Vande Bharat Express
Vande Bharat Express sakal
मुंबई

Mumbai : पश्चिम रेल्वेची वंदे भारत एक्सप्रेस झटपट हिट !

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पश्चिम रेल्वेची पहिली आणि देशांची तिसरी मुंबई ते गांधीनगर वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवाशांमध्ये झटपट हिट झाली आहेत.

मुंबई सेंट्रल ते गांधीनगर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या एकूण आसन क्षमेतच्या १३० टक्के पेक्षा जास्त प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याची पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहेत.

सध्या देशभारत १० वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस धावत असून १७ राज्यांमधील १०८ जिल्ह्यांना जोडत आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस ही देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे.

ही वंदे भारत ट्रेन ३० सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झाली आहे. या गाडीला बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद येथील थांबे आहेत. याशिवाय मुंबई ते गांधीनगर वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस ही सात जिल्ह्यांला जोडण्याचे काम करत आहे.

१३० टक्यांच्या सरासरी व्यापासह, ट्रेन प्रवाशांमध्ये त्वरित हिट बनली आहे. नवी दिल्ली-वाराणसी, नवी दिल्ली-श्री माता वैष्णो देवी कटरा,

नवी दिल्ली-अंब अंदौरा, चेन्नई सेंट्रल-म्हैसूर, नागपूर-बिलासपूर, हावडा-न्यू जलपाईगुडी, सिकंदराबाद-विशाखापट्टणम, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - साईनगर शिर्डी दरम्यान सध्या वंदे भारत ट्रेन धावत आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला सतत गुरांची धडक होत होती. त्यामुळे रेल्वेचे नुकसान होत होते. रेल्वे रुळावर येणाऱ्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई ते अहमदाबाद दरम्यान अंदाजे ६२२ किमी लांबीचे मेटल धातूंचे कुपन बाधत आहे.

यासाठी अंदाजे २४५. २६ कोटी रुपये खर्च येणार आहेत. यासाठी सर्व ८ निविदा देण्यात आल्या असून काम जोरात सुरू आहे. हे काम मे २०२३ अखेर पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT